WhatsApp Group Join Now

टाटा पंच चा पंचनामा करण्यासाठी टोयोटा ने लॉंच केली Toyota Taisor, दमदार इंजिन व प्रीमियम फीचर्स फक्त 7 लाखात

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Toyota Taisor Detail In Marathi

Toyata कंपनीने बर्‍याच दिवसांनंतर आपली मिनी SUV लॉंच केली आहे. ती म्हणजे Toyota Taisor, ही गाडी कमी पैशात तुम्हाला SUV ची मजा देते. मध्यमवर्गीय लहान कुटुंबीयांसाठी ही गाडी उत्तम पर्याय आहे. ही गाडी सध्या भारतीय कार बाजारात दबदबा असलेली टाटा पंच ला तगडी टक्कर देण्यासाठी toyata ने लॉंच केली आहे. चला तर मग या आर्टीकल च्या माध्यमातून आपण जाणुन घेऊ की या गाडीची काय खासियत आहे.

 

Toyota Taisor चे एडवांस फीचर्स

टाटा पंचला मात देण्यासाठी कंपनीने शक्य ते फीचर्स देण्याचा प्रयत्न केला आहे. या गाडीचा बाहेरील व आतून लुक आकर्षित व मनमोहक बनविण्याचा पूर्ण प्रयत्न कंपनीने केला आहे. तसेच एडजस्टेबल सीट, पावर स्टीयरिंग, पावर विंडो, ऑटोमेटिक क्लाइमेट कंट्रोल, लेदर पावर एडजस्टेबल स्टेअरिंग व्हील, फुल एडजस्टेबल एलईडी हेडलाइट्स, वायरलेस फोन चार्जर, 09 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले तोही अँड्रॉईड ऑटो व अ‍ॅपल कारप्ले कनेक्टसह, सुरक्षेसाठी तब्बल 6 एयरबॅगा आणि 360 डिग्री पार्किंग कॅमेरा इत्यादी अशी आधुनिक व प्रीमियम फीचर्स या गाडीमध्ये पहायला मिळतात.

 

Toyota Taisor चे ताकतवर इंजिन

Toyota Taisor ही गाडी वेगवेगळ्या 12 वेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. त्यासाठी 998 cc ते 1197 cc असे वेगवेगळे इंजिन पर्याय ही उपलब्ध आहेत. ही गाडी पेट्रोल व CNG अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तसेच ऑटोमॅटीक व 6 स्पीड गिअरमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. माइलेज बद्दल सांगायचे तर 20 किलोमीटर प्रति लीटर असा चांगला माइलेज SUV असुनही ही गाडी प्रदान करते. इंधन टाकीची क्षमता 37 लिटर इतकी आहे. दमदार पिकअप व चांगला माइलेज असल्याने या गाडीचा ड्राइविंग अनुभव चांगला देते. आणि 16 इंचाच्या अलॉय व्हीलसह डिस्क ब्रेक असल्याने ही गाडी चालवताना स्पोर्टि फिलिंग देते.

 

Toyota Taisor ची किंमत

ही गाडी एसयूवी श्रेणीत आहे व फीचर्सही चांगले आहेत. परंतु किंमत त्या मानाने थोडीशी कमीच आहे. बेस मॉडेल पेट्रोल ची एक्स शोरूम मुंबई येथील किंमत 7 लाख 70 हजारांपसून सुरू होते. व टॉप मॉडेल पेट्रोल ची किंमत 13 लाखांपर्यंत जाते. तर CNG मॉडेल ची किंमत 8 लाख 70 हजारापर्यंत आहे.

 

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment