Mahindra XUV 3XO : महिंद्रा ही भारतातील आघाडीची SUV कार निर्माती कंपनी आहे. भारतात महिंद्रा च्या SUV गाड्यांचा दबदबा आहे. परंतु मिड रेंज SUV मध्ये टाटा व मारुतीच्या गाड्यांचा दबदबा आहे. त्यासाठीच महिंद्रा ने आपली मिड रेंज SUV असलेली Mahindra XUV 3XO ही गाडी एप्रिल महिन्यात लॉंच केली आहे. लॉंच झाल्यावर एका दिवसातच या गाडीच्या तब्बल 50 हजार युनिटची बुकिंग झाली होती.
Mahindra XUV 3XO मध्ये आहेत कमालीचे फीचर्स
कमी किंमत असुनही या गाडीमधे उत्कृष्ट असे फीचर्स पहायला मिळतात. ज्यामध्ये ड्युअल जोन क्लाइमेट कंट्रोल, एंटरटेनमेंट साठी 6 साउंड स्पीकर आणि अँड्रॉईड ऑटो व अॅपल कारप्ले कनेक्टसह 10.25 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यामुळे तुम्ही प्रवासादरम्यान उत्तम एंटरटेनमेंटचा आनंद घेऊ शकता. तसेच इतर प्रकारच्या फीचर्स मध्ये वायरलेस मोबाईल चार्जर, मल्टी फंक्शन पावर स्टीयरिंग व्हील, एडजस्टेबल ड्राइवर सीट, पावर विंडों, टैकोमीटर तसेच पाच सीटर असलेली ही गाडी पूर्ण एयर कंडिशनिंग आहे.
Mahindra XUV 3XO ची किंमत
Mahindra XUV 3XO ही गाडी CNG वेरिएंट मध्ये उपलब्ध नाही. परंतु पेट्रोल व डिझेल मध्ये तब्बल 25 वेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. तसेच ऑटोमॅटीक व मॅनुअल मध्ये सुद्धा उपलब्ध आहे. म्हणून ग्राहकांना वेगवेगळ्या 25 व्हरायटी किमतीमध्ये सुद्धा मिळतात. या गाडीच्या बेस पेट्रोल मॉडेलची एक्स शोरूम किंमत 7 लाख 50 हजारापासून सुरू होते. व टॉप पेट्रोल मॉडेलची एक्स शोरूम किंमत 15 लाख 50 हजारापर्यंत आहे. ही एक्स शोरूम मुंबई येथील किंमत आहे. ऑन रोड किंमत वेगवेगळी असू शकते.
Mahindra XUV 3XO चे शक्तिशाली इंजिन
तस पहायला गेलं तर महिंद्रा च्या जवळपास सगळ्याच गाड्यांचे इंजिन दमदार असते. आणि Mahindra XUV 3XO सुद्धा यापासून वेगळी नाही. या गाडीमधे 1498 cc चे डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे की 109 bhp ची पावर निर्माण करते. व 300 nm चा जबरदस्त टॉर्क जनरेट करते. तसेच 1197 cc चे पेट्रोल इंजिनही आहे. ते सुद्धा 109 bhp ची पावर निर्माण करते. व डिझेल च्या तुलनेत थोडा कमी म्हणजे 200 nm चा टॉर्क जनरेट करते. ही गाडी ऑटोमॅटीक व 6 स्पीड मॅनुअल गिअर बॉक्स मध्ये सुद्धा उपलब्ध आहे. तसेच 19 किलोमीटर प्रति लिटर माइलेज पेट्रोल इंजिन देते तर डिझेल इंजिन 22 किलोमीटर प्रति लिटर चा माइलेज देते.
Mahindra XUV 3XO संबंधित इतर माहिती
या गाडीचा लुक ही खूपच छान आहे. आणि यासोबतच वेगवेगळ्या चक्क 16 रंगांमध्ये ही गाडी येते. सुरक्षेसाठी 6 एयरबॅग, एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, स्पीड अलर्ट व चाइल्ड सेफ्टी लॉक यासारखे आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रायगड येथे लिपिक पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | Raigad DCC Bank Recruitment - 26 August 2024
- ITBP कांस्टेबल किचन सर्विस च्या 819 जागांसाठी 10वीं पास साठी भरती नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024
- RRB Railway NTPC Vacancy: रेलवे NTPC भरतीसाठी 12वीं पास विद्यार्थ्यांना भरती चे नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024