Nissan X-Trail: भारतीय कार बाजारात SUV श्रेणीतील गाड्यांची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे कंपन्यांमधे चुरशीची लढत लागली आहे की कोणती कंपनी चांगले फीचर्स, आकर्षक डिझाइन व स्वस्त किमतीसह गाडी बाजारात दाखल करते. परंतु या यादीत टाटा व महिंद्राचा दबदबा निर्माण झाला आहे. त्यासाठीच निसान कंपनीने Nissan X-Trail ही आपली SUV गाडी साधारण ऑगस्ट महिन्यात लॉंच करण्याचे ठरविले आहे. ही गाडी अत्याधुनिक फीचर्ससह दमदार इंजिन असलेली आहे. व या गाडीची तगडी टक्कर होंडाई क्रेटा, महिंद्रा xuv700 व टाटा हॅरीअर शी असेल.
Nissan X-Trail मध्ये आहेत खास अत्याधुनिक फीचर्स
या गाडीमधे अँड्रॉईड ऑटो व अॅपल कारप्ले कनेक्टसह 12.25 इंचाचा इन्फोटेनमेंट टचस्क्रीन डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. तसेच 8 साऊंड स्पीकर, ऑटोमॅटीक क्लायमेट कंट्रोल, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, डिजिटल घड्याळ, 360 डिग्रीचा पार्किंग कॅमेरा, एडजस्टेबल मिरर, पावर स्टेअरिंग आणि आवाजावर कंट्रोल होण्याची सिस्टीम मिळण्याची अपेक्षा आहे.
Nissan X-Trail चे पावरफुल इंजिन
या गाडीचे इंजिन अतिशय पावरफुल आहे. 4 सिलेंडर व 6 स्पीड गिअर असलेले 1995 cc से इंजिन यामध्ये मिळेल. जे की 15 किलोमीटर प्रति लिटर इतका माइलेज प्रदान करण्यात सक्षम असेल. 65 लिटरची इंधन टाकी यासोबत असेल. परंतु ही गाडी पेट्रोल, डिझेल व ऑटोमॅटीक, मॅन्युअल अशा कोणकोणत्या वेरिएंट मध्ये असेल याबाबत अजून कंपनीकडून कुठलीही स्पष्टता नाही.
काय असेल Nissan X-Trail ची किंमत ?
या गाडीचे उत्कृष्ट डिजाइन, आधुनिक फीचर्स व दमदार इंजिन बघता किंमत थोडीशी जास्तच असण्याची शक्यता आहे. साधारण 25 लाखापासून हिची एक्स शोरूम किंमत सुरू होईल असा अंदाज व्यक्त होत आहे.
Nissan X-Trail आहे सुरक्षित
Nissan X-Trail ही गाडी 7 सीटर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिच्यात 6 एयर बॅग असतील. आणि एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, चाइल्ड सेफ्टी लॉक, सीट बेल्ट अलर्ट, स्पीड अलर्ट व पावर डोर लॉक्स असे सेफ्टी फीचर्स असतील.
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रायगड येथे लिपिक पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | Raigad DCC Bank Recruitment - 26 August 2024
- ITBP कांस्टेबल किचन सर्विस च्या 819 जागांसाठी 10वीं पास साठी भरती नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024
- RRB Railway NTPC Vacancy: रेलवे NTPC भरतीसाठी 12वीं पास विद्यार्थ्यांना भरती चे नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024