WhatsApp Group Join Now

Mahindra Bolero चा नवीन लुक TATA Harrier चा झाला आता पत्ता कट

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

New Mahindra Bolero : महिंद्रा कंपनीने आपली रफ अँड टफ एसयूवी असलेली New Mahindra Bolero लॉंच केली आहे. म्हणून जर तुम्ही एसयूवी गाडी घेण्याच्या बेतात असाल तर नवीन महिंद्रा बोलेरो बद्दल विचार करू शकता. महिंद्रा बोलेरो ही गाडी खूप प्रसिद्ध आहे. बहुतांशी सरकारी विभाग आणि पोलिस व महसुल विभागाची तर ही गाडी जणू आवडतीच आहे असे पहायला मिळते. ग्रामीण भागात सुद्धा या गाडीचा दबदबा आहे. त्यामुळेच आता महिंद्रा कंपनीने नवीन अवतारात New Mahindra Bolero ही गाडी लॉंच केली आहे. चला तर आजच्या या लेखात आपण जाणुन घेऊ की काय काय खासियत आहे या गाडीची

 

New Mahindra Bolero चे पावरफुल शक्तिशाली इंजिन

ही गाडी फक्त डिझेल इंजिन मध्ये येते. जे की 1493 सीसी चे 2.2 लीटरचे आहे. आणि ते 260 nm चा टाॅर्क व 96 bhp ची जबरदस्त पावर निर्माण करते. म्हणून ऑफरोडींग चा अनुभव चांगला येतो. माइलेज बद्दल सांगायचे तर 17 किलोमीटर प्रति लीटर इतका माइलेज ही गाडी देते. आणि 50 लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली आहे. परंतु यामध्ये ऑटोमॅटीक व्हर्जन नाही फक्त 5 गिअर असलेले मॅनुअल व्हर्जनच आहे.

 

New Mahindra Bolero चे आकर्षक डिझाइन व आधुनिक फीचर्स

जुन्या बोलेरो पेक्षा New Mahindra Bolero चे डिझाइन अधिकच आकर्षक आहे. पुढच्या बाजूला नवीन काळ्या रंगाची ग्रील, स्टायलिश एलईडी हेड लाइट्स आणि 15 इंचाचे अलॉय व्हील या गाडीला स्पोर्टी लूक देतात. आतील इंटेरियर बघितले तर 6.70 इंचाचा कलरफुल डिजिटल टचस्क्रीन डिस्प्ले तोही ब्लूटूथ कनेक्टिविटीसह तसेच पावर स्टेअरिंग, पावर विंडो, यूएसबी मोबाइल चार्जर, एयर कंडीशन, क्रूज कंट्रोल इत्यादी प्रकारचे आधुनिक फीचर्स आहेत.

 

New Mahindra Bolero ची किंमत व इतर माहिती

एकूण 5 रंगांमध्ये ही गाडी उपलब्ध आहे. सात आसनी या गाडीचे सीट पहिल्यापेक्षा अजूनही आरामदायी बनविण्यात आले आहेत. परंतु किंमत ही पहिल्यापेक्षा थोडीशी वाढली आहे. बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 10 लाखापासून सुरू होते तर टॉप मॉडेलची एक्स शोरूम किंमत 14 लाख 30 हजार रुपयांपर्यंत जाते.

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment