bank seized vehicle auctions : जगभरात ग्रीन एनर्जी चे वारे वाहत आहेत. त्यामुळे भारतीय कार बाजारात CNG, इलेक्ट्रिक व हायब्रिड गाड्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कंपन्यांमधे स्पर्धा निर्माण होऊन गाड्यांच्या किंमतीही वाढत चालल्या आहेत. अशातच सर्वसामान्य लोकांचे गाडी घेण्याचे स्वप्न अपूर्णच राहत आहे. परंतु आज आम्ही अशा लोकांसाठी फक्त 3 लाखात तुमचे गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहोत. चला तर मग जाणुन घेऊ या आर्टीकल च्या माध्यमातून की तुम्ही स्वस्तात गाडी कशी घेऊ शकणार ते
कशी मिळते स्वस्तात गाडी ?
आज आपण बँकेने ओढून आणलेली 40 लाखांची टोयोटा फॉर्च्यूनर फक्त 3 लाखात कशी मिळेल याबाबत माहिती घेणार आहोत. बर्याचदा लोक उत्साहाच्या भरात पैसे नसतानाही थोडेसे पैसे डाउनपेमेंट भरून गाडी घेतात. परंतु जास्त व्याजदर आणि वेगवेगळ्या फीस च्या माध्यमातून बॅंका जास्तीचे पैसे ग्राहकांकडून वसूल करतात. त्यामुळे गाडीची किंमत वाढते आणि गाडी मालक उर्वरीत हप्ते भरू न शकल्याने बॅंका संबंधित गाड्या जप्त करून त्यांचा कायदेशीर लिलाव करून आपले पैसे वसूल करतात. बर्याचदा संबंधित बँक तेवढीच रक्कम वसूल करते, जेवढी रक्कम ग्राहकांकडे बाकी आहे. म्हणून अशा गाड्या लिलावाद्वारे खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते.
कोणती गाडी मिळणार व किती किमतीमध्ये
या लिलावाअंतर्गत तुम्हाला टोयोटा कंपनीची SUV श्रेणीतील Fortuner 3.0 OL 4 WD ही गाडी मिळणार आहे. या गाडीची किंमत 3, 32,500 रुपये इतकी ठेवण्यात आली. आणि ही गाडी बैंगलोर स्थित ग्राहकाची आहे. त्याने ही गाडी 2010 मध्ये खरेदी केली होती. परंतु आता या गाडीचा ताबा संबंधित बँकेकडे आहे. या लिलावाद्वारे गाडी मिळविणाऱ्या ग्राहकाला बँकेकडून गाडीचा ताबा कायदेशीरपणे हस्तांतरित केला जाईल. या गाडीच्या मॉडेलची माहिती पुढीलप्रमाणे –
Variant: Fortuner 3.0 OL 4 WD MT Manufacturer: Toyota Kirloskar Ltd. Vehicle No: KA 22 P 6378 Year Of Mfg: 2010
लिलावाची तारीख व वेळ
ही गाडी खरेदी करण्यासाठी अर्जाची प्रक्रीया 31 जुलै 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजेपासून सुरू करण्यात येणार आहे. आणि 02 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. आणि त्यानंतर 02 ऑगस्ट 2024 सकाळी 11 वाजेनंतर हा लिलाव सुरू होईल.
नवीन फॉर्च्यूनरची इतर माहीती व किंमत
नवीन फॉर्च्यूनर ची एक्स शोरूम मुंबई येथील किंमत जवळपास 33 लाखांपासून सुरू होते. आणि टॉप मॉडेल ची एक्स शोरूम किंमत तब्बल 50 लाखांपर्यंत जाते. या गाडीमध्ये 2755 cc चे दमदार इंजिन आहे. या गाडीची इत्यंभूत माहितीसाठी – येथे दाबा
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रायगड येथे लिपिक पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | Raigad DCC Bank Recruitment - 26 August 2024
- ITBP कांस्टेबल किचन सर्विस च्या 819 जागांसाठी 10वीं पास साठी भरती नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024
- RRB Railway NTPC Vacancy: रेलवे NTPC भरतीसाठी 12वीं पास विद्यार्थ्यांना भरती चे नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024