WhatsApp Group Join Now

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17,727 जागांसाठी मेगा भरती ; त्वरित अर्ज करा | SSC Bharti 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

SSC Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत पदवी पास विद्यार्थ्यांसाठी मेगा भरती निघाली आहे. यामार्फत केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये जवळपास 20 पेक्षा जास्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने पदवी पास असलेल्या व नौकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपआपले अर्ज सादर करावेत. 

 

SSC Bharti 2024 च्या रिक्त पदांची संख्या

एकूण 17,727 पदे भरायची आहेत. जी की विविध विभागात आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इंस्पेक्टर, सब इंस्पेक्टर, टॅक्स असिस्टंट, उच्चतम लिपिक व विविध विभागातील अधिकारी दर्जाची पदे भरण्यात येणार आहेत.

 

SSC Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. किंवा समतुल्य शैक्षणिक अर्हता प्राप्त केलेला असावा.

 

SSC MTS Bharti वयाची अट

उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 पर्यंत विविध पदांसाठी 18 वर्षे ते 25 वर्षे / 27 /30/32 वर्षे दरम्यान असावे. आणि एससी, एसटी 05 वर्षे तर ओबीसी 03 वर्षे अतिरिक्त सुट आहे. (सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहीरात पहा)

 

SSC Bharti 2024 अर्जाचा शुल्क

सर्वसाधारण व ओबीसी उमेदवारांसाठी 100 रुपये तर एससी, एसटी, महिला, माजी सैनिक आणि अपंग उमेदवारांना शुल्क माफ करण्यात आला आहे.

 

SSC Bharti 2024 निवड प्रक्रिया

अर्ज सफ़लतापूर्वक दाखल करण्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, मध्ये कंप्यूटर वर आधारित CBT Tier – l परीक्षा घेण्यात येईल. त्यामध्ये पास झालेल्या उमेदवारांची डिसेंबर महिन्यात Tier – ll परीक्षा घेण्यात येईल. त्यांनंतर डेटा एंट्री टेस्ट घेतली जाईल. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी करण्यात येईल. आणि त्यानंतर वैद्यकीय चाचणी घेऊन अंतिम निवड करण्यात येईल.

 

SSC Bharti 2024 इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा : इथे बघा

आमच्या WhatsApp group मध्ये join व्हा : Join Now

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 24 जुलै 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment