WhatsApp Group Join Now

शासकीय नौकरी : भारतीय हवाई दलात भरती 2024 ; येथे करा अर्ज | Indian Airforce Bharti

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Indian Airforce Bharti : देशसेवेसाठी उत्सुक असलेल्या तरुणांसाठी Indian Airforce मार्फत भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. इच्छुक व पात्र असलेल्या तरुणांनी खाली दिलेली माहिती वाचून व आपली पात्रता ठरवून दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज दाखल करावा.

 

Indian Airforce Bharti च्या रिक्त पदांची संख्या

या जागा अग्निवीरवायु इनटेक या पदासाठी भरल्या जाणार आहेत. परंतु सध्या रिक्त असलेल्या पदांची संख्या जाहीर करण्यात आलेली नाही. ती नंतर जाहीर करण्यात येईल.

 

Indian Airforce Bharti शैक्षणिक पात्रता

उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून इंग्रजी, गणित व फिजिक्स हे विषय घेऊन 50 टक्के गुणांसह 12 वी पास असावा. किंवा 50 टक्के गुणांसह 12वी पास + 50 टक्के गुणांसह इंग्रजी किंवा मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाइल, कम्प्यूटर व आईटी यापैकी कोणताही डिप्लोमा

 

Indian Airforce Bharti वयाची अट

उमेदवाराचा जन्म 03 जुलै 2004 ते 03 जानेवारी 2008 दरम्यान झालेला असावा. तसेच कोणत्याही प्रवर्गासाठी वयामध्ये अतिरिक्त सुट नाही.

 

Indian Airforce Bharti अर्जाचा शुल्क

सर्व प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क 550 रुपये अधिक GST राहील.

 

Indian Airforce Bharti निवड प्रक्रिया

अर्ज दाखल केल्यानंतर पात्र उमेदवारांची 18 ऑक्टोबर 2024 पासून लेखी परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर शारीरिक चाचणी घेण्यात येईल. पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करून व वैद्यकीय चाचणी घेऊन अंतिम निवड करण्यात येईल.

 

 

Indian Airforce Bharti इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कोठेही

संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा : इथे बघा

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 28 जुलै 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment