WhatsApp Group Join Now

शासकीय नौकरी : LIC मध्ये ज्युनियर असिस्टंट पदासाठी भरती | LIC HFL Bharti 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

LIC HFL Bharti 2024 : LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मार्फत पदवी पास विद्यार्थ्यांसाठी भरती निघाली आहे. यामार्फत केंद्र सरकारच्या LIC या महामंडळात ज्युनियर असिस्टंट या पदासठी भरती करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने पदवीधर असलेल्या व नौकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपआपले अर्ज सादर करावेत.

 

LIC HFL Bharti 2024 च्या रिक्त पदांची संख्या

एकूण 200 पदे भरायची आहेत. LIC HFL Bharti 2024 मार्फत ‘ज्युनियर असिस्टंट’ ही पदे भरण्यात येणार आहेत.

 

LIC HFL Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. आणि कॉम्प्युटर सिस्टीममधील ऑपरेटिंग आणि कामकाजाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

 

LIC HFL Bharti 2024 वयाची अट

उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 पर्यंत 21 वर्षे ते 28 वर्षे दरम्यान असावे.

 

LIC HFL Bharti 2024 अर्जाचा शुल्क

सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी 944 रुपये शुल्क आकारण्यात येईल.

 

LIC HFL Bharti 2024 निवड प्रक्रिया

अर्ज सफ़लतापूर्वक दाखल करण्यानंतर सप्टेंबर महिन्यात कंप्यूटर वर आधारित CBT परीक्षा घेण्यात येईल. जी की 200 गुणांची असेल. आणि फक्त इंग्रजी भाषेत असेल. त्यामध्ये पास झालेल्या उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल. त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करून व वैद्यकीय चाचणी घेऊन अंतिम निवड करण्यात येईल.

 

LIC HFL Bharti 2024 इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा : इथे बघा

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 14 ऑगस्ट 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment