WhatsApp Group Join Now

500 km ची रेंज काही मिनिटातच फुल चार्जिंग! 4×4 व ऑफरोडींग वाली नवीन Tata Harrier इलेक्ट्रिक

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

tata harrier ev : टाटा मोटर्स भारतात इलेक्ट्रिक गाड्याबनविण्यामध्ये आघाडीवर आहे. आणि कार उद्योगात तर ग्लोबल खिलाडी आहे. अशातच टाटा कंपनीने आपल्या भारतीय ग्राहकांना tata harrier ev लॉंच करून एक जबरदस्त गिफ्ट दिलेले आहे. भारतात suv श्रेणीत tata harrier ही सगळ्यांना पछाडून नंबर 1 होती, आता तिचा इलेक्ट्रिक अवतार जो की 4×4 सेगमेंट मध्ये असेल आणि ऑफरोडींग मध्ये सुद्धा दमदार असेल असा अवतार कंपनी घेऊन येत आहे. या tata harrier ev ची प्रतीक्षा ग्राहक खूप आतुरतेने करत आहेत.

 

tata harrier ev बॅटरी पावर

ही गाडी 4×4 असल्याने यामध्ये शक्तीशाली 60 kwh चा बॅटरी पॅक असेल. आणि 2 इलेक्ट्रिक मोटर सुद्धा असतील. चार्जिंग बद्दल बोलायचे झाले तर फक्त एका वेळेस चार्जिंग केली तर साधारण 500 किलोमीटर पर्यंत ही गाडी चालू शकेल. तसेच या गाडीला कनेक्ट करून तुम्ही दुसरी गाडी देखील चार्ज करू शकतात असे फीचर्स यामध्ये आहेत.

 

tata harrier चे फीचर्स

या गाडीमधे पॅनारॉमीक सनरूप देखील पहायला मिळेल. तसेच 360 डिग्रीचा पार्किंग कॅमेरा, पावर फ्रंट सीट, पावर टेलगेट, 10.25 इंचाचा डिजिटल नेव्हीगेशन टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यामध्ये अँड्रॉईड ऑटो व अ‍ॅपल कारप्ले व ब्लूटुथ सपोर्ट असेल.

 

Tata harrier ev ची किंमत

या गाडीची पाहीली झलक 2023 मध्ये भरलेल्या ऑटो एक्स्पो मध्ये पहायला मिळाली होती. आता कंपनीच्या म्हणण्यानुसार ही गाडी 2025 च्या सुरवातीला ग्राहकांना 28 लाख ते 32 लाखांदरम्यान मिळेल. जुन्या harrier पेक्षा Tata harrier ev ची किंमत ही जास्त असणार आहे. कारण ही गाडी 4×4 असणार आहे. शिवाय यामध्ये फीचर्स ही जास्त असणार आहेत.

 

Tata harrier ev ची इतर माहिती

तस पहायला गेल तर ही गाडी फक्त तीन वेरिएंटस मध्ये असेल. व तीनही वेरिएंट ऑटोमॅटीक असतील. आणि ही गाडी पांढरा, काळा व ग्रे अशा फक्त तीनच रंगांमध्ये उपलब्ध असेल.

ही एकच गाडी लॉंच करून टाटा ने ऑफरोडींग मध्ये महिंद्रा थार व suv मध्ये महिंद्रा xuv700 या दोन्ही गाड्यांना मात देण्याचे ठरवले आहे. तसेच ही गाडी भारतातील पहिली इलेक्ट्रिक suv असेल. म्हणुन जर तुमचा गाडी घेण्याची तयारी असेल तर काही दिवस थांबून ही गाडी घेऊ शकतात.

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment