WhatsApp Group Join Now

5 डोर वाली महिंद्रा थार बघितली का ? 15 ऑगस्टला होणार लॉंच ! पॅनारोमिक सनरूफ अजून बरच काही बघा फीचर्स 

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

जसा सलमान खान ईद ला चित्रपट रिलीज करतो, तशी महिंद्रा कंपनीसुद्धा 15 ऑगस्टला आपल्या गाड्या लॉंच करते. परंतु या 15 ऑगस्ट ची वाट कार ग्राहक जास्तच आतुरतेने बघत आहेत. कारण या दिवशी mahindra Thar 5 door लाँच होत आहे. तसेच xuv700 3 door सारख्या इतरही महिंद्राच्या गाड्या लॉंच होणार आहेत. जुनी 3 door वाली Thar सुद्धा 15 ऑगस्टला लॉंच झाली होती. असा अंदाज आहे की mahindra Thar 5 door चे नाव कंपनी अर्माडा ठेवू शकते. तर बघुया आपण या गाडीमधे काय खास फीचर्स आहेत ते 

 

mahindra Thar 5 door मध्ये ADAS व LKA सिस्टम आहे सर्वात खास

ADAS म्हणजे एडवांस ड्रायवर असिस्टंट सिस्टम यामध्ये आधुनिक एडवांस कॅमेरा व इतर काही सेंसर असतात. जे होणार्‍या दुर्घटनेबद्दल ड्रायवरला जाणीव करून देतात व दुर्घटना टाळण्यास मदत होते. आणि LKA म्हणजे लेन किपींग असिस्टंट हे फीचर्स हायवेवर गाडी चालवताना कामात येते. हायवेवर गाडी चालवताना चुकून गाडी दुसर्‍या लेन मध्ये जाऊ नये गाडी एकाच लेन मध्ये केंद्रीत चालावी यासाठी हे फीचर्स खूप मदत करतात.

 

mahindra Thar 5 door चे नवीन आधुनिक फीचर्स

जुन्या Thar पेक्षा नवीन mahindra Thar 5 door फीचर्स ने जास्त मालामाल झालेली दिसते. यामध्ये इलेक्ट्रिक पॅनारोमिक सनरूफ, आधुनिक प्रीमियम इंटीरियर डिझाइन, 360 डिग्री पार्किंग कॅमेरा, 10.2 इंचाची टचस्क्रीन व एंटरटेनमेंट सिस्टम, 6 एयरबॅग, डबल झोन एसी, 19 इंचाचे बेस्ट ऑफरोडींग अलॉय व्हील, ऑटोमॅटीक क्लायमेट कंट्रोल सिस्टीम

 

mahindra Thar 5 door चे इंजिन

2184 cc चे इंजिन देण्यात आले आहे. जे की पेट्रोल मध्ये 2 लिटर टर्बो व डिझेल मध्ये 2.2 लिटर चे असेल आणि पेट्रोल व डिझेल या दोन्ही इंजिन मध्ये 6 गियर वाले मॅनुअल व ऑटोमॅटीक असे दोन्ही पर्याय उपलब्ध असतील. तसेच दोन्ही मध्ये 4×4 इंजिन असेल.

 

mahindra Thar 5 door ची किंमत

या 5 सिटर गाडीमधे इतके अत्याधुनिक फीचर्स आहेत म्हणून तिची किंमत ही जुन्या Thar पेक्षा जास्तच बेस मॉडल 18 लाख ते टॉप मॉडल 25 ते 28 लाखांपर्यंत जाऊ शकते.

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment