WhatsApp Group Join Now

CBIC Recruitment 2024 : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभाग मार्फत विविध पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

CBIC Recruitment 2024 : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क विभाग मार्फत क्रीडापटूंसाठी विविध पदांवर भरती होणार आहे. विविध क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य पातळीवर व इंटर युनिवर्सिटी लेवल वर प्राविण्यता मिळविलेल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. इच्छुक व पात्र असलेल्या तरुणांनी खाली दिलेली माहिती वाचून व आपली पात्रता ठरवून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज दाखल करावा.

 

CBIC Recruitment 2024 च्या रिक्त पदांची संख्या

एकूण 22 जागा भरायच्या आहेत. त्यापैकी, 07 जागा कर सहाय्यक, 01 जागा लघुलेखक ग्रेड-II आणि 14 जागा हवालदार च्या भरण्यात येणार आहेत.

 

CBIC Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता

कर सहाय्यक पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी धारण केलेला असावा आणि डेटा एंट्रीचा वेग प्रति तास 8000 की डिप्रेशन इतका असावा. तसेच संगणकाचे मुलभूत ज्ञान असावे.

लघुलेखक ग्रेड-II पदासाठी 12 वी पास आणि लघुलेखनाचा 80 शब्द प्रति मिनिट डिक्टेशन स्पीड असावा.

हवालदार पदासाठी मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास

तसेच संबंधित क्रिडा पात्रतेसाठी खाली दिलेली अधिकृत जाहीरात पहावी.

 

CBIC Recruitment 2024 वयाची अट

उमेदवाराचे वय 19 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत 18 वर्षे ते 27 वर्षे दरम्यान असावे. परंतु एससी, एसटी 05 वर्षे तर ओबीसी 03 वर्षांची अतिरिक्त सुट देण्यात आली आहे.

 

CBIC Recruitment 2024 अर्जाचा शुल्क

कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाहीत.

 

CBIC Recruitment 2024 निवड प्रक्रिया

सर्वप्रथम उमेदवारांची क्रीडा टेस्ट घेतली जाईल. त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येईल. त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कर सहाय्यक व स्टेनोग्राफर पदासाठी स्किल टेस्ट घेतली जाईल. व शेवटी कागदपत्रे पडताळणी करून व अंतिम निवड करण्यात येईल. या सर्व परीक्षा हैद्राबाद येथे आयोजित केल्या जातील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

 

हे सुद्धा वाचा : रेल्वे भरती : भारतीय रेल्वे मार्फत मेडिकल विभागात विविध पदांसाठी भरती ; येथे करा अर्ज | RRB Paramedical Staff Bharti 2024

 

CBIC Recruitment 2024 इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : हैद्राबाद झोन

संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा

ऑफलाइन अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख : 19 ऑगस्ट 2024

अर्ज सादर करण्याचा पत्ता : The Additional Commissioner (CCA) O/o The Principal Commissioner of Central Tax, Hyderabad GST Bhavan, L.B.Stadium Road, Basheerbagh Hyderabad 500004

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment