WhatsApp Group Join Now

जिल्हा परिषद भरती 2024 : एकूण पदे – 0539 | मासिक वेतन – 20,000 रूपये | Gadchiroli Zilla Parishad Teacher Recruitment 2024 

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Gadchiroli Zilla Parishad Teacher Recruitment 2024 : गडचिरोली जिल्हा परिषदेत शिक्षक पदासाठी भरती आयोजीत केली जात आहे. गडचिरोली जिल्हय़ात नियमित शिक्षकांची भरती होत नाही तोपर्यंत, जवळपास 03 वर्षांसाठी ही भरती कंत्राटी तत्त्वावर होत आहे. यासाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी 20,000 रुपये प्रतिमाह इतके वेतन असेल. इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. इच्छुक व पात्र असलेल्या तरुणांनी खाली दिलेली माहिती वाचून व आपली पात्रता ठरवून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज दाखल करावा.

 

Gadchiroli Zilla Parishad Teacher Recruitment 2024 च्या रिक्त पदांची संख्या

एकूण 539 जागा भरायच्या आहेत. ज्या की प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) – 419 व पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) या पदासाठी – 120 इतक्या आहेत.

 

Gadchiroli Zilla Parishad Teacher Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता

प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) पदासाठी – उमेदवार 12 वी पास असावा आणि D.Ed किंवा D.T.Ed आणि TET / CTET पेपर 1

पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) पदासाठी – उमेदवार पदवीधर असावा. आणि D.Ed किंवा B.Ed आणि TET/CTET पेपर 2 -TAIT

 

Gadchiroli Zilla Parishad Teacher Recruitment 2024 वयाची पात्रता 

उमेदवाराचे वय 13 ऑगस्ट 2024 अखेर 18 वर्षे ते 40 वर्षे दरम्यान असावे. परंतु मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षांची अतिरिक्त सुट देण्यात आली आहे.

 

Gadchiroli Zilla Parishad Teacher Recruitment 2024 अर्जाचा शुल्क

सर्व उमेदवारांसाठी शुल्क माफ करण्यात आला आहे.

 

Gadchiroli Zilla Parishad Teacher Recruitment 2024 इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण गडचिरोली जिल्हा

संपूर्ण अधिकृत जाहिरात व अर्जाचा नमुना : इथे बघा

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा

ऑफलाइन अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख : 27 ऑगस्ट 2024

अर्ज सादर करण्याचा पत्ता : शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment