WhatsApp Group Join Now

Bank Jobs : 10वी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी ! बॅंकेत 300 हून अधिक जागा; कुठे अन् कसा भरणार अर्ज? जाणून घ्या

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Satara DCC Bank Recruitment : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत 10 वी पास व पदवीधरांना मिळणार नौकरीची संधी Satara DCC Bank Recruitment ची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. त्यानिमित्ताने 10 वी पास व कोणत्याही शाखेतील पदवीधर असलेल्या व नौकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपआपले अर्ज सादर करावेत. अर्ज दाखल करण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांनी खाली दिलेली अधिकृत जाहीरात जरूर पहावी.

Satara DCC Bank Recruitment च्या रिक्त पदांची संख्या

एकूण 323 जागा भरायच्या आहेत. त्यापैकी

1)  कनिष्ठ लेखनिक (जुनियर क्लर्क) – 263

2)  कनिष्ठ शिपाई – 60

 

Satara DCC Bank Recruitment शैक्षणिक पात्रता

लिपीक पदासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. आणि MS-CIT पास असावा. किंवा समतुल्य संगणकाची अर्हता प्राप्त केलेला असावा.
शिपाई पदासाठी उमेदवार किमान 10 वी पास असावा. तसेच इंग्रजी भाषेचे व संगणकाचे ज्ञान सुद्धा असावे.

 

Satara DCC Bank Recruitment वयाची अट

उमेदवाराचे वय 31 जुलै 2024 अखेर लिपिक पदासाठी 21 वर्षे ते 38 वर्षे दरम्यान असावे. आणि शिपाई पदासाठी 18 वर्षे ते 38 वर्षे दरम्यान असावे.

 

Satara DCC Bank Recruitment अर्जाचा शुल्क

सर्व उमेदवारांसाठी 590 रुपये रुपये शुल्क आहे.

 

Satara DCC Bank Recruitment निवड प्रक्रिया

अर्ज दाखल केल्यानंतर 90 गुणांची कंप्यूटर वर आधारित CBT परीक्षा घेण्यात येईल. त्यामध्ये पास झालेल्या उमेदवारांची 05 गुणांची मुलाखत घेतली जाईल. आणि 05 गुण कागदपत्रे पडताळणी साठी असतील. व या गुणांची एकत्रित बेरीज करून अंतिम निवड करण्यात येईल.

 

Satara DCC Bank Recruitment इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण सातारा जिल्हा

संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा : इथे बघा

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 21 ऑगस्ट 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment