BMC Clerk Recruitment 2024 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत नौकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. या जाहिरातीची वाट महाराष्ट्रातील तरुण एक – दीड वर्षांपसून पाहत होते. आणि अखेर ही जाहीरात प्रसिद्ध झाली. BMC Clerk Recruitment 2024 बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. जसेकी शैक्षणिक पात्रता, वया संबंधित पात्रता इत्यादी प्रकारची माहिती देण्यात आली आहे. पात्र व इच्छुक असलेल्या तरुणांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या वेबसाइट वर जाऊन दाखल करावेत.
BMC Clerk Recruitment 2024 च्या रिक्त पदांची संख्या
BMC Clerk Recruitment 2024 मार्फत ‘ कार्यकारी सहायक ‘ पदाच्या एकूण 1846 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामध्ये,
- OPEN – 506
- OBC – 452
- EWS – 185
- SEBC – 185
- VJ(A) – 049
- NT(B) – 054
- NT(C) – 039
- NT(D) – 038
- SBC – 046
- SC – 142
- ST – 150
BMC Clerk Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता
उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पहिल्या प्रयत्नात 45 टक्के गुणांसह पास असावा. आणि इंग्रजी टाइपिंगचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टाइपिंगचा वेग 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकिय वाणिज्य प्रमाणपत्र ही अर्हता धारण केलेला असावा. आणि MS-CIT किंवा समतुल्य अर्हता प्राप्त असावा. (नसेल तर लागल्यानंतर 02 वर्षांच्या आत सादर करावे.) तसेच दहावीला मराठी आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण असायला हवे.
BMC Clerk Recruitment 2024 वयाची अट
उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 38 वर्षे दरम्यान असावे. परंतु मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षांची अतिरिक्त सुट देण्यात आली आहे.
BMC Clerk Recruitment 2024 अर्जाचा शुल्क
सर्वसाधारण उमेदवारांसाठी 1000 रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांना 900 रुपये शुल्क आकारण्यात येईल.
BMC Clerk Recruitment 2024 निवड प्रक्रिया
अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची संगणकावर ऑनलाइन पद्धतीने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा घेण्यात येईल. परीक्षा साधारण ऑक्टोबर /नोव्हेंबर महिन्यात घेण्यात येईल. एकुण 100 प्रश्न असतील त्यामध्ये, मराठी 25, इंग्रजी 25, सामान्य ज्ञान 25 आणि 25 प्रश्न बौद्धिक चाचणीचे असतील. यासाठी एकूण गुण 200 असतील. यामध्ये वरील चार विषयांपैकी प्रत्येकी 25 – 25 प्रश्नांचे एक असे चार सेक्शन तयार करण्यात येतील. त्यापैकी प्रत्येक सेक्शन ला 25 मिनिटे वेळ दिला जाईल. 25 मिनिटे संपल्यावर हा सेक्शन बंद होईल आणि दुसरा सेक्शन सुरू होईल. आता परत बंद झालेल्या सेक्शन मध्ये जाता येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. परीक्षा इंग्रजी व मराठी या भाषांमध्ये देता येतील. लेखी परीक्षेमध्ये पास होणार्या उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करून अंतिम निवड करण्यात येईल.
हे सुद्धा वाचा : Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती ; 10 वी पास ते पदवीधरांना संधी
BMC Clerk Recruitment 2024 इतर माहिती
नौकरीचे ठिकाण : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र
संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा
भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा
ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा : इथे बघा
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 09 सप्टेंबर 2024
ऑनलाइन अर्ज दाखल सुरू होण्याची तारीख : 20 ऑगस्ट 2024
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रायगड येथे लिपिक पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | Raigad DCC Bank Recruitment - 26 August 2024
- ITBP कांस्टेबल किचन सर्विस च्या 819 जागांसाठी 10वीं पास साठी भरती नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024
- RRB Railway NTPC Vacancy: रेलवे NTPC भरतीसाठी 12वीं पास विद्यार्थ्यांना भरती चे नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024