WhatsApp Group Join Now

AFMS Bharti 2024 : इंडियन आर्मी च्या मेडिकल विभागात भरती ; त्वरित करा अर्ज

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

AFMS Bharti 2024 : देशसेवेसाठी उत्सुक असलेल्या तरुणांसाठी इंडियन आर्मी मार्फत भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. AFMS Bharti 2024 मार्फत आर्मी च्या मेडिकल विभागात नौकरीची संधी चालून आली आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. इच्छुक व पात्र असलेल्या तरुणांनी खाली दिलेली माहिती वाचून व आपली पात्रता ठरवून दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज दाखल करावा. 

 

AFMS Bharti 2024 च्या रिक्त पदांची संख्या

या जागा SSC मेडिकल ऑफिसर या पदासाठी भरल्या जाणार आहेत. पुरुषांसाठी 338 व महिलांसाठी 112 अशा एकूण 450 जागा भरायच्या आहेत.

 

AFMS Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

उमेदवार हा मान्यताप्राप्त संस्थेतून MBBS ही पदवी घेतलेला असावा. परंतु राज्य वैद्यकीय परिषदेने/MCI/NBE मान्यता दिलेल्या पदव्युत्तर पदवी धारक देखील अर्ज करू शकतात. तसेच उमेदवाराची इंटर्नशिप 15 ऑगस्ट 2024 पूर्वी पूर्ण झालेली असावी.

 

AFMS Bharti 2024 वयाची अट

उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2024 अखेर 30/35 वर्षांपर्यंत असावे. तसेच कोणत्याही प्रवर्गासाठी वयामध्ये अतिरिक्त सुट नाही.

 

AFMS Bharti 2024 अर्जाचा शुल्क

सर्व उमेदवारांना 200 रुपये शुल्क आकारण्यात येईल.

 

AFMS Bharti 2024 निवड प्रक्रिया

अर्ज सफ़लतापूर्वक दाखल केल्यानंतर पात्र उमेदवारांना शॉर्टलिस्ट करून 28 ऑगस्ट 2024 पासून मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल. मुलाखत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करून व वैद्यकीय चाचणी घेऊन अंतिम निवड करण्यात येईल.

 

AFMS Bharti 2024 इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कोठेही

संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा : इथे बघा

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 04 ऑगस्ट 2024

मुलाखतीचा पत्ता : आर्मी हॉस्पिटल (R&R), दिल्ली कॅन्ट

 

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment