WhatsApp Group Join Now

जगातली पहिली CNG बाइक भारतात होणार लॉंच, पहा फीचर्स व किंमत | Bajaj cng bike

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Bajaj cng bike

जगात सगळीकडे ग्रीन एनर्जी चे वारे वाहत आहेत. सगळ्या ऑटोमोबाईल कंपन्या सीएनजी व इलेक्ट्रिक गाड्या बाजारात उतरवत आहेत. परंतु संपूर्ण जगामध्ये आतापर्यंत सीएनजी बाइक कोणत्याही कंपनीने तयार केली नव्हती. आणि ती करामत भारतात बजाज कंपनीने केली आहे. कंपनीने आपली bajaj cng bike 05 जुलै 2024 रोजी लॉंच करण्याचे ठरविले आहे. कंपनीने फाइटर व ब्रुजर अशा दोन नावाचे ट्रेडमार्क रजिस्टर केले आहे. आता कंपनी आपल्या bajaj cng bike चे नाव काय ठेवते त्यावरही सर्वांचे लक्ष लागले आहे. चला तर मग जाणुन घेऊ या बाइक बद्दल इत्यंभूत माहिती.

 

Bajaj cng bike चे फीचर्स व आकर्षक लूक

ही बाइक 2 वेरिएंट मध्ये लॉंच होईल. Cng सोबत आपत्कालीन परिस्थितीसाठी या बाइक मध्ये पेट्रोल ची सुविधा पण देण्यात आली आहे. यामध्ये एक स्विच नॉब देण्यात आला आहे. जो की cng ते पेट्रोल शिफ्ट करेल. तसेच यामध्ये स्लीक मिरर स्टेम, कॉम्पैक्ट विंडस्क्रीन, 17 इंचाचे ट्यूबलेस टायर्स, सस्पेंशन सेटअप व ABS इंडिकेटर यासारखे आधुनिक फीचर्स देण्यात आलेले आहेत.

 

Bajaj cng bike ची किंमत

Bajaj cng bike ची किंमत 80 हजार पासून सुरू होईल असा अंदाज आहे. आणि कंपनी एक ते सव्वा लाख युनिट प्रत्येक वर्षी बनवेल अशी माहिती समोर आली आहे.

 

Bajaj cng bike ची इतर माहिती

या Bajaj cng bike मध्ये दमदार इंजिन देण्यात आले आहे. म्हणून तब्बल 90 किलोमीटर प्रति किलोग्रॅम इतका माइलेज ही बाइक देऊ शकते. बजाज कंपनीच्या महाराष्ट्रातील संभाजीनगर शहरात स्थित असलेल्या प्लांट मध्ये या बाइक चे प्रोडक्शन करण्यात येत आहे. पावरफुल इंजिन, चांगला माइलेज, कमी किंमत व आधुनिक फीचर्स या मुळे ही बाइक भारतीय बाजारपेठेत तहलका करेल असे वाटत आहे. Bajaj cng bike चे खरी स्पर्धा hero HF deluxe, hero splendor, Honda Shine व TVS star city यांच्याशी असेल.

 

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment