WhatsApp Group Join Now

भारतात नवीनच लाँच झाली Citroen eC3 Electric Car, कमी किंमत व जास्तीचे फीचर्स

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Citroen eC3 Electric Car : जगभरात ग्रीन एनर्जी ची मागणी वाढत आहे. त्यानिमित्ताने इलेक्ट्रिक गाड्यांची डिमांड सुद्धा वाढत आहे. भारतात सेडान पासून तर एसयूवी पर्यंत इलेक्ट्रिक गाड्या बाजारात उपलब्ध आहेत. परंतु आता एका नवीन कंपनीने मिनी एसयूवी सेगमेंट Citroen eC3 Electric Car लॉंच केली आहे. जी की किफायतशीर किमतीमध्ये उपलब्ध आहे. जर तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याची तयारीत असाल तर या कार बद्दल तुम्ही विचार करू शकता. चला तर मग या आर्टीकल मध्ये आपण जाणुन घेऊ की काय आहेत या गाडीचे फीचर्स

 

Citroen eC3 Electric Car ची उत्तम अशी बॅटरी क्षमता

Citroen eC3 Electric Car मध्ये 29.2 kWh अशी दमदार बॅटरी देण्यात आली आहे. जी की फक्त 57 मिनिटांमधे पुर्णपणे चार्जिंग होऊन जाते. आणि 320 किलोमीटर इतके अंतर धावू शकते. फास्ट चार्जिंग व चांगली मिड रेंज यामुळे ही गाडी इतरांच्या तुलनेत वेगळी ठरते

 

Citroen eC3 Electric Car मध्ये आहेत प्रीमियम फीचर्स

या कारमध्ये 10.2 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. जो की अँड्रॉईड ऑटो व अ‍ॅपल कारप्ले व ब्लूटुथ सपोर्ट करतो. तसेच इलेक्ट्रिक पार्किंग सेंसर, कॅमेरा, पावर एडजस्टेबल स्टेअरिंग, एडजस्टेबल वेंटिलेटेड सीट, मोबाईल वायरलेस चार्जर क्लायमेट कंट्रोल आणि पावर रियर व्यू मिरर असे अनेक प्रीमियम फीचर्स या गाडीमधे देण्यात आलेले आहेत.

 

Citroen eC3 Electric Car ची किंमत

ही गाडी पाच आसनी आहे. आणि वेगवेगळ्या पाच वेरिएंट मध्ये येते. तर त्याच्या बेस वेरिएंट ची एक्स शोरूम दिल्ली येथील किंमत 11 लाख 50 हजार रुपयांपासून सुरू होते. आणि टॉप वेरिएंट ची एक्स शोरूम किंमत 14 लाख रुपयांपर्यंत जाते. ही एक्स शोरूम दिल्ली येथील किंमत असल्याने थोडी कमी आहे. महाराष्ट्रात जास्त असू शकते. कारण वेगवेगळ्या राज्यांचा व केंद्रशासित प्रदेशांचा कर हा वेगवेगळा असतो. आणि ऑन रोड किंमत मध्ये सुद्धा निश्चितच वाढ होत असते.

 

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment