WhatsApp Group Join Now

सरकारी विभागात क्लर्क पदासाठी मेगा भरती : पदवीधर उमेदवारांना नौकरीची संधी ; येथून करा अर्ज | Clerk Bharti 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Clerk Bharti 2024 : महाराष्ट्रातील तरुणांसाठी लिपिक या पदाच्या नौकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. Clerk Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. जसेकी शैक्षणिक पात्रता, वया संबंधित पात्रता इत्यादी प्रकारची माहिती देण्यात आली आहे. पात्र व इच्छुक असलेल्या तरुणांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने खाली दिलेल्या वेबसाइट वर जाऊन दाखल करावेत.

 

Clerk Bharti 2024 च्या रिक्त पदांची संख्या

Clerk Bharti 2024 मार्फत लिपिक या पदासाठी एकूण 6128 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

 

Clerk Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी धारण केलेला असावा. आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे. त्यामध्ये प्रमाणपत्र, डिप्लोमा असणे आवश्यक आहे किंवा हायस्कूल /कॉलेज मध्ये संगणक /आयटी यापैकी एक विषय घेतलेला असावा.

 

Clerk Bharti 2024 वयाची अट

उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 पर्यंत 20 वर्षे ते 28 वर्षे दरम्यान असावे. परंतु एससी, एसटी 05 वर्षे तर ओबीसी 03 वर्षांची अतिरिक्त सुट देण्यात आली आहे.

 

Clerk Bharti 2024 अर्जाचा शुल्क

सर्वसाधारण, आर्थिक मागास प्रवर्ग (EWS) व ओबीसी उमेदवारांसाठी 850 रुपये तर एससी, एसटी,माजी सैनिक व अपंग उमेदवारांना 175 रुपये शुल्क आकारण्यात येईल.

 

Clerk Bharti 2024 निवड प्रक्रिया

अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची पूर्व परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेची तारीख ऑगस्ट महिन्यात असेल. या पूर्व परीक्षेमध्ये गणित, इंग्रजी व बुद्धिमत्ता या 3 विषयांचा समावेश असेल, आणि 100 गुणांची ही परीक्षा असेल. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा ऑक्टोबर 2024 मध्ये घेण्यात येईल. जी 190 प्रश्नांची व 200 गुणांची असेल. ज्यामध्ये गणित, इंग्रजी, बुद्धिमत्ता व सामान्य आर्थिक ज्ञान या विषयांचा समावेश असेल. पूर्व व मुख्य दोन्ही परीक्षा महाराष्ट्रासाठी इंग्रजी, हिंदी, कोकणी व मराठी या भाषांमध्ये देता येतील. मुख्य परीक्षेमध्ये पास होणार्‍या उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करून अंतिम निवड करण्यात येईल.

 

 

Clerk Bharti 2024 इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात कोठेही

संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा : इथे बघा

आमच्या WhatsApp group मध्ये join व्हा : Join Now

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 21 जुलै 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment