Dharmaveer Anand Dighe Disability Financial Assistance Scheme : महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि पुरुषांसाठी सुद्धा लाडका भाऊ योजना जाहीर केली आणि त्यानंतर आता दिव्यांगांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रेरणा घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य’ योजना जाहीर केली आहे. चला तर मग जाणुन घेऊ या योजनेची सविस्तर माहिती
धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य’ योजना नेमकी काय?
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दिव्यांगांसाठी सरकारने विविध योजनेमार्फत काम केले आहे. तसेच शासनाच्या नोकर भरती मध्ये सुद्धा दिव्यांगांना विशेष आरक्षण देण्यात आले आहे. परंतु आता धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य’ योजना मार्फत दिव्यांगांना दरमहा 1 हजार ते 3 हजार रुपये पर्यंत लाभ देण्यात येईल. 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंग असलेल्या व्यक्तीला 1 हजार रुपये प्रतिमाह तर 80 टक्क्यांपेक्षा जास्त अपंग असलेल्या व्यक्तीला 3 हजार रुपये प्रतिमाह लाभ थेट बँकेमार्फत देण्यात येईल. हा लाभ 2024 पासून ते 2029 पर्यंत 05 वर्षासाठी मिळणार आहे.
धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य’ योजना पात्रता
महाराष्ट्रातील व बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असलेले दिव्यांग व्यक्ती जसे की दृष्टीहीन, कर्णबधीर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व इतर प्रकारचे शारीरिक व्यंगत्व असलेले व्यक्ती यासाठी पात्र आहेत. तसेच अर्ज करणार्या दिव्यांग व्यक्तीकडे पिवळे अथवा निळे वैश्विक ओळखपत्र (UIAD CARD) असणे आवश्यक आहे. आणि उमेदवाराचे बॅंकेत खाते असावे. व त्याला आधार कार्ड लिंक असावे. तसेच या योजनेची सविस्तर माहिती, निकष, योजनेच्या अर्टी, शर्ती, आवश्यक कागदपत्रे व अर्जाचा नमुना https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य’ योजनेसाठी अर्ज कसा करायचा
Dharmaveer Anand Dighe Disability Financial Assistance Scheme साठी पात्र व इच्छुक असलेले उमेदवार https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर येथे दिव्यांग व्यक्तींसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना (सन 2024-25 ते सन 2028-29)’ यावर क्लिक केल्यानंतर तेथे अर्जाचा नमुना उपलब्ध होईल. सदर योजनेचे अर्ज भरण्यास अंतिम मुदत नाहीये. सर्व कागदपत्रांसहित पूर्ण भरलेले अर्ज सर्व संबंधित विभाग कार्यालयात सकाळी 10 ते दुपारी 04 या वेळेत जमा करावेत
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रायगड येथे लिपिक पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | Raigad DCC Bank Recruitment - 26 August 2024
- ITBP कांस्टेबल किचन सर्विस च्या 819 जागांसाठी 10वीं पास साठी भरती नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024
- RRB Railway NTPC Vacancy: रेलवे NTPC भरतीसाठी 12वीं पास विद्यार्थ्यांना भरती चे नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024