WhatsApp Group Join Now

Ola च्या स्कूटरला टक्कर देण्यासाठी आली Electric Activa, जाणून घ्या फीचर्स व किंमत

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

भारतात 2 व्हीलर गाड्यांमध्ये होंडा कंपनी चा परफॉर्मन्स खूपच तगडा आहे. आणि honda activa बद्दल बोलायचे झाले तर ती भारतात मोपेड गाड्यांमध्ये नंबर एकची आहे. तिचा दमदार परफॉर्मन्स, चांगला माइलेज व मजबूतीमुळे ती ग्रामीण भागातही नंबर एकची आहे. तर आता इलेक्ट्रिक वाहनांसाठी लोकांचा प्रतिसाद पाहता, व ola च्या स्कूटरला मात देण्यासाठी होंडा कंपनीने Honda Activa Electric लॉंच करण्याची तयारी केली आहे. तर जाणुन घेऊ आपण honda activa electric मध्ये काय फीचर्स असतील ते?

 

Honda Activa Electric चे फीचर्स

कंपनीच्या म्हणण्यानुसार Honda Activa Electric ही भारतीय बाजारात तहलका करेल. कारण यामध्ये सर्व आधुनिक तंत्रज्ञान वापरून फीचर्स समाविष्ट केले आहेत. यामध्ये तुम्हाला स्मार्टफोन कनेक्टिविटी व डिजिटल इंन्फोटेनमेंट टचस्क्रीन सिस्टीम, यूएसबी पोर्ट, ब्लूटूथ कनेक्टिविटी, म्युझिक प्लेयर, रायडींग मोड, क्रुज कंट्रोल, मोबाईल चार्जर, एलईडी लाइट्स, डिस्क ब्रेक आणि 10 इंचाचे मोठे व आकर्षक अलॉय व्हील यासारखे बरेच आधुनिक फीचर्स कंपनीकडून या गाडीमध्ये नव्याने समाविष्ट केले आहेत.

 

Honda Activa Electric ची किंमत

Honda Activa Electric ही 2025 च्या सुरवातीला लॉंच होणार आहे आणि कंपनीकडून अद्याप किमतीबद्दल काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. परंतु या गाडीचे फीचर्स बघता असा अनुमान आहे. की तिची एक्स शोरूम किंमत एक लाखाच्या जवळपास असणार आहे.

 

Honda Activa Electric ची इतर माहिती

Honda Activa Electric यामध्ये पावरफुल लिथियम ची बॅटरी देण्यात आली आहे. जी की एका वेळेस चार्जिंग केल्याने तब्बल 280 किलोमीटर पर्यंत धावेल. आणि स्पीड बद्दल बोलायचे झाले तर 100 किलोमीटर प्रति तास इतक्या टॉप स्पीड ने ही गाडी धावू शकेल.

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment