WhatsApp Group Join Now

Maruti Alto ला धूळ चाटवण्यासाठी आली Hyundai ची नवीन धांसू कार, किंमत मात्र 5 लाख

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Hyundai Grand i10 Nios : भारतात नंबर दोनची कार उत्पादन कंपनी Hundai ने कमी बजेटमध्ये आपली Hyundai Grand i10 Nios ही गाडी लॉंच केली आहे. या 5 सीटर गाडी मध्ये सर्व आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. ही गाडी Maruti Alto ला मार्केट मधून बाहेर करेल असा अंदाज व्यक्त होत आहे. चला तर मग आपण या लेखात जाणुन घेऊ या गाडीची संपूर्ण माहिती.

 

Hyundai Grand i10 Nios चे आकर्षक फीचर्स

ही गाडी तब्बल 9 रंगांमध्ये उपलब्ध आहे. तसेच अँड्रॉईड ऑटो, अ‍ॅपल कारप्ले व ब्लूटुथ कनेक्टिव्हिटीसह 8 इंचाची इन्फोटेंमेंट टचस्क्रीन, वायरलेस फ़ोन चार्जिंग, डे एंड नाइट रियर व्यू मिरर, टायर प्रेशर मॉनिटर, एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, एडजस्टेबल एलईडी हेडलाइट्स, पावर स्टेअरिंग, एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, व्हाईस कमांड, क्लायमेट कंट्रोल आणि फुल एयर कंडिशनिंग यासारखे अनेक प्रकारचे फीचर्स समाविष्ट आहेत.

 

Hyundai Grand i10 Nios ची इंजिन क्षमता

ही गाडी CNG व पेट्रोल अशा दोन्हीही वेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. 1197 सीसी चे इंजिन या गाडीमधे देण्यात आले आहे. जे की 82 bhp ची पावर व 114 nm चा टाॅर्क निर्माण करते. आणि 19 किलोमीटर प्रति लिटर इतका माइलेज देते. तर CNG वेरिएंट 27 किलोमीटर प्रति किलो एवढा माइलेज देते. तसेच ऑटोमॅटीक व 5 स्पीड गिअर मॅनुअल मध्ये ही गाडी उपलब्ध आहे. 37 लिटर इतकी इंधन टाकीची क्षमता आहे.

 

Hyundai Grand i10 Nios ची किंमत व ऑफर

Hyundai Grand i10 Nios ही गाडी चक्क 14 वेगवेगळ्या वेरिएंट मध्ये येते, म्हणून तिच्या किमतीमध्ये सुद्धा खूप व्हरायटी पहायला मिळते. म्हणुन या गाडीच्या बेस वेरिएंटची एक्स शोरूम किंमत 5 लाख 90 हजार रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेल ची एक्स शोरूम किंमत 8 लाख 50 हजारांपर्यंत येते. ऑफर बद्दल बोलायचे झाले तर तुम्ही जर कैंटीन स्टोर्स डिपार्टमेंट (CSD) येथून ही गाडी खरेदी करतात तर तुम्हाला 28 टक्क्यांऐवजी 14 टक्के जीएसटी भरावा लागेल. म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या मॉडेलनुसार 1 लाखापासून ते 1 लाख 50 हजारांपर्यंत बचत होऊ शकते.

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment