WhatsApp Group Join Now

बिना परीक्षा थेट भरती ; भारतीय डाक विभागात 44,228 जागांसाठी मेगा भरती | 10 वी पास

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

India Post Bharti : भारतीय डाक (India Post) विभागात मोठ्या प्रमाणात मेगा भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे. 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय डाक विभागात नोकरी अत्यंत सोयीची व कामाचा व्याप कमी असलेली मानली जाते. म्हणून पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर खाली दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज दाखल करावा. कारण शेवटच्या दिवसात संकेतस्थळ जाम होण्याची शक्यता असते. अर्ज दाखल करण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांनी India Post Bharti ची खाली दिलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून घ्यावी. 

 

India Post Bharti च्या रिक्त पदांची संख्या

एकूण 44,228 पदे भरायची आहेत. त्यापैकी काही पदे ब्रांच पोस्ट मास्टर व काही असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ची भरण्यात येणार आहेत.

 

India Post Bharti शैक्षणिक पात्रता

उमेदवार हा मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी पास असावा. किंवा समकक्ष शैक्षणिक योग्यता धारण केलेला असावा. तसेच बेसिक कम्पुटरचे ज्ञान व सायकल चालवण्याचे ज्ञान सुद्धा आवश्यक आहे.

 

India Post Bharti वयाची अट

उमेदवाराचे वय 05 ऑगस्ट 2024 पर्यंत 18 वर्षे ते 40 वर्षे दरम्यान असावे. परंतु एससी, एसटी 05 वर्षे तर ओबीसी 03 वर्षांची अतिरिक्त सुट देण्यात आली आहे.

 

India Post Bharti अर्जाचा शुल्क

सर्वसाधारण, आर्थिक मागास प्रवर्ग व ओबीसी उमेदवारांसाठी 100 रुपये तर एससी, एसटी, महिला, माजी सैनिक आणि अपंग उमेदवारांना शुल्क माफ करण्यात आला आहे.

 

India Post Bharti निवड प्रक्रिया

अर्ज सफ़लतापूर्वक दाखल करण्यानंतर 10 वी मध्ये प्राप्त केलेल्या टक्केवारीनुसार मेरिट लिस्ट जाहीर करण्यात येईल. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी करून अंतिम निवड यादी जाहीर करण्यात येईल. यासाठी कुठलीही लेखी परीक्षा होणार नाही

 

India Post Bharti इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा : इथे बघा

आमच्या WhatsApp group मध्ये join व्हा : Join Now

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 05 ऑगस्ट 2024

भरलेला अर्ज संपादित (Edit) करण्याची मर्यादा : 06 ऑगस्ट 2024 ते 08 ऑगस्ट 2024 पर्यंत

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment