ladka bhau yojana : महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर केल्याने पुरुषांसाठी सुद्धा योजना जाहीर करावी अशी मागणी सर्वत्र होत होती. त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत ladka bhau yojana ची घोषणा केली. परंतु या योजनेचे मुळ नाव ladka bhau yojana नसून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असे आहे. चला तर मग जाणुन घेऊ या योजनेची सविस्तर माहिती
ladka bhau yojana नेमकी काय?
महाराष्ट्रात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर तरुण 12 वी, आयटीआय, डिप्लोमा व पदवी उत्तीर्ण होत आहेत. परंतु त्यापैकी बहुतांश तरुणांना नोकरीचा व व्यवसायाचा अनुभव नसल्याने त्यांना नोकरी मिळणे व व्यवसाय स्थापित करण्यात अडचणी येत आहेत. त्यासाठीच तरुणांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन व्यवसाय व नोकरी साठी त्यांची क्षमता विकसित करण्यासाठी ही योजना महाराष्ट्र सरकारने जाहीर केली आहे. सरकारने यासाठी 5,500 करोड रुपयांची तरतूद केली आहे.
ladka bhau yojana पात्रता
महाराष्ट्रातील रहिवासी असलेले व 12 वी, डिप्लोमा, पदवी व पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असलेले तरुण यासाठी पात्र आहेत. तसेच अर्ज करणार्या उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 35 वर्षापर्यंत असावे. आणि उमेदवाराचे बॅंकेत खाते असावे. व त्याला आधार कार्ड लिंक असावे.
ladka bhau yojana चा लाभ कसा व कोणाला मिळणार
बारावी, आयटीआय , डिप्लोमा , पदवी व पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण झालेल्या तरुणांना सरसकट हा लाभ मिळणार नाही. त्यासाठी संबंधित उमेदवाराला कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत कंपनीमध्ये 6 महिन्यांचे कार्य प्रशिक्षण देण्यात येईल. व त्यावेळेस त्यांना दरमहा विद्यावेतनच्या स्वरुपात ही रक्कम देण्यात येईल. त्यासाठी, 12 वी पास तरुणाला 6000 रुपये, आयटीआय व डिप्लोमा 8000 रुपये, आणि पदवीधर तरुणांसाठी 10,000 रुपये इतकी रक्कम असेल.
हे सुद्धा वाचा : जिल्हा परिषद योजनेमार्फत शिलाई मशीन, सायकल व ताडपत्रीचे वाटप सुरु; त्वरित करा अर्ज
ladka bhau yojana साठी अर्ज कसा करायचा
ladka bhau yojana साठी पात्र व इच्छुक असलेले उमेदवार https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करू शकतील.विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग/स्टार्टअप्स, विविध आस्थापना यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदवतील. त्यानंतर अर्ज दाखल केलेल्या व त्यामध्ये पात्र असलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणाची संधी दिली जाईल. व प्रशिक्षण चालू झाल्यावर उमेदवाराच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जाईल. परंतु एका महिन्यात सलग 10 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर राहणाऱ्या उमेदवारास त्या महिन्याचा लाभ मिळणार नाही.
ladka bhau yojana official GR
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रायगड येथे लिपिक पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | Raigad DCC Bank Recruitment - 26 August 2024
- ITBP कांस्टेबल किचन सर्विस च्या 819 जागांसाठी 10वीं पास साठी भरती नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024
- RRB Railway NTPC Vacancy: रेलवे NTPC भरतीसाठी 12वीं पास विद्यार्थ्यांना भरती चे नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024