WhatsApp Group Join Now

इनोव्हाचा सुफडा साफ करण्यासाठी स्वस्त बजेट मध्ये आली Maruti Invicto, 23kmpl माइलेज व धाँसू लूक

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Maruti Suzuki Invicto : मारुती सुझुकी ही भारतातील कार विक्रीमध्ये नंबर एकची कंपनी आहे. कारण मारुतीच्या गाड्या किमतीला कमी, मेंटेनन्सला कमी व माइलेजला जास्त असल्याने सर्वसामान्यांना परवडणाऱ्या असतात. परंतु मारुतीने पहिल्यांदा आपली सर्वात महागडी गाडी Maruti Suzuki Invicto ही भारतीय बाजारात लॉंच करून तहलका केला आहे. लॉंच होण्याच्या आधीच या गाडीच्या जवळपास 7, 000 बुकींग झाल्या होत्या. या गाडीमध्ये फीचर्सची अक्षरशः गर्दी झाली आहे. इतके फीचर्स यामध्ये आहेत. व या गाडीचा लुक खूपच आकर्षक व मॉडर्न असल्याने ही गाडी Innova, xuv700, hondai creta व mg hector यांचा भारतीय बाजारातील सुपडा साफ करणार असे भाकीत होत आहे.

 

Maruti Suzuki Invicto चे फीचर्स व कमालीचा लूक

Maruti Suzuki Invicto ही टोयोटा व मारुतीच्या ग्लोबल पार्टनरशिप मधून तयार झालेली असल्याने तिचा लूक काही अंशी इनोव्हा हायक्राॅस सारखा वाटतो. फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर 10 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले तोही अँड्रॉईड ऑटो व अ‍ॅपल कारप्ले कनेक्टसह तसेच, 6 साऊंड स्पीकर्स, अ‍ॅमबीयंट लाइट्सह पॅनारोमिक सनरूफ, इलेक्ट्रिक अडजस्टेबल मिरर, एलईडी हेडलाईट, एलईडी टेललाईट, टाइप A व C USB चार्जर, वेंटिलेटेड फ्रंट सीट व 360 डिग्रीचा पार्किंग कॅमेरा सारख्या इतरही सुविधा आहेत.

 

Maruti Suzuki Invicto चे सुरक्षा फीचर्स

MUV सेगमेंटची ही कार सुरक्षेच्या दृष्टीनेही चांगलीच आहे. यामध्ये 6 एअरबॅगा, अँटी लॉक ब्रेक सिस्टीम, ट्राफिक अलर्ट, ब्लाइंड स्पॉट मॉनिटर व लेन ट्रेस असिस्टं सारखे सुरक्षेचे फीचर्स पहायला मिळतात.

 

Maruti Suzuki Invicto चे दमदार इंजिन व जास्तीचा माइलेज

Maruti Suzuki Invicto ही गाडी फक्त पेट्रोल वेरिएंट मध्ये येते. इंजिन बाबत बोलायचे झाले तर 1987 cc चे पेट्रोल इंजिन येते. जे की 150 bhp ची पावर व 188 nm चा टाॅर्क निर्माण करते. हे इंजिन BS-VI 2.0 व्हर्जनमध्ये आहे. ही गाडी मॅनुअल गिअर बॉक्स मध्ये उपलब्ध नाही फक्त ऑटोमॅटीक व्हेरीयंट मध्ये उपलब्ध आहे. 170 किलोमीटर प्रति तास इतका टॉप स्पीड असलेली ही गाडी 23 किलोमीटर प्रति लिटर इतका माइलेज प्रदान करते. इंधन टाकीची क्षमताही 52 लिटर इतकी आहे. म्हणजे एकदा तुम्ही टाकी फुल केली तर तब्बल 1000 किलोमीटरचा प्रवास करू शकतात.

 

Maruti Suzuki Invicto ची किंमत

7 सीटर असलेल्या या गाडीची किंमत मारुतीच्या इतर गाड्यांच्या तुलनेत जास्तच आहे. 3 मॉडल मध्ये उपलब्ध असलेल्या या गाडीच्या बेस वेरिएंटची एक्स शोरूम किंमत 25 लाख रुपयांपासून सुरू होते. तर टॉप वेरिएंटची एक्स शोरूम किंमत 28.90 लाखांपर्यंत जाते.

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment