Maruti celerio भारतात एकदम कमी किमतीच्या ज्या गाड्या आहेत. त्यापैकी एक आहे. शिवाय उत्तम माइलेजसह या गाडीला मेंटेनन्स ही फारच कमी आहे. त्यामुळे ही गाडी कमी बजेट असलेल्या लोकांसाठी बेस्टच राहीली आहे. परंतु आता पुन्हा एकदा जास्तीचे फीचर्स, जास्तीचा माइलेज व आकर्षक लूकसह maruti ने तिची New Maruti Celerio 2024 लाँच केली आहे. जर तुम्हाला कमी बजेटची फॅमिली कार घ्यायची असेल तर ही गाडी तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. चला तर मग या लेखच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो या गाडीबद्दल सर्वकाही माहिती
New Maruti Celerio 2024 चे फीचर्स
या गाडीचे इंटेरियर डिझाईन खूपच आकर्षक बनविण्यात आले आहे. यामध्ये पावर स्टेअरिंग, मल्टी फंक्शन स्टेअरिंग व्हील, पावर विंडो, 7 इंचाची एंटरटेनमेंट टचस्क्रीन, 2 एअरबॅग, चाइल्ड सेफ्टी लॉक, एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, सीट बेल्ट वॉर्निंग इत्यादी बरेचसे फीचर्स या गाडीमधे तुम्हाला अनुभवायला मिळतील.
New Maruti Celerio 2024 इंजिन व माइलेज
New Maruti Celerio 2024 ही गाडी पेट्रोल व सीएनजी अशा दोन्ही पर्यायांसह उपलब्ध आहे. तसेच ऑटोमॅटीक व मॅनुअल अशा दोन्ही टाइप मध्ये सुद्धा ही गाडी मिळते. आणि इंजिन बद्दल बोलायचे तर 998 cc च्या क्षमतेचे इंजिन या गाडीमध्ये देण्यात आले आहे. त्यामुळे या गाडीचे पेट्रोल वेरिएंट 26 किलोमीटर प्रति लिटर तर सीएनजी वेरिएंट 35 किलोमीटर प्रति किलोग्राम याप्रमाणे माइलेज देते.
New Maruti Celerio 2024 ची किंमत
तस पहायला गेल तर ही गाडी मोठ्या परिवारासाठी उत्तम नाही. परंतु छोट्या फॅमिली व कमी बजेटसाठी ही गाडी चांगला पर्याय आहे. या गाडीच्या बेस मॉडेलची सुरवात 4.90 लाखापासून सुरू होते. तर टॉप मॉडेलची किंमत 7.90 लाख रुपयांपर्यंत जाते आणि सीएनजी मॉडेलची 6.70 लाख रुपयांपर्यंत जाते. ही किंमत मुंबई येथील एक्स शोरूम किंमत आहे ऑन रोड किंमतीत अजून वाढ होऊ शकते
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रायगड येथे लिपिक पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | Raigad DCC Bank Recruitment - 26 August 2024
- ITBP कांस्टेबल किचन सर्विस च्या 819 जागांसाठी 10वीं पास साठी भरती नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024
- RRB Railway NTPC Vacancy: रेलवे NTPC भरतीसाठी 12वीं पास विद्यार्थ्यांना भरती चे नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024