WhatsApp Group Join Now

इनोव्हाचा खेळ खत्म करण्यासाठी एर्टिगा चा किलर लुक, काय आहे फीचर्स जाणून घ्या | New Maruti Ertiga

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

New maruti ertiga : भारतीय कार बाजार मध्ये MPV सेगमेंट मध्ये टोयोटा इनोव्हाचा बोलबाला समाप्त करण्यासाठी New Maruti ertiga लॉंच झाली आहे. ही गाडी भारतातील सर्वोत्तम मिड रेंज फॅमिली कार मानली जाते. देशातील बराचसा नोकरदार वर्ग सुट्ट्यांमध्ये फॅमिलीसोबत फिरण्यासाठी ही गाडी वापरतो. तर आता कंपनीने यामध्ये सर्व आधुनिक फीचर्स लोड करून ही गाडी मार्केटमध्ये उतरवली आहे. चला तर मग new maruti ertiga बद्दल सविस्तर जाणुन घेऊ. 

 

New maruti ertiga चे फीचर्स

जुन्या गाडीच्या तुलनेत या नवीन गाडीमधे आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेले आकर्षक असे इंटेरियर डिझाइन आहे. ज्यामध्ये जिओ फेस अलर्ट, अलेक्सा कनेक्टिव्हिटी, स्मार्ट वॉच अ‍ॅप, 7 इंचाचा प्रो टचस्क्रीन इंफोटेनमेंट डिस्प्ले, प्रीमियम साऊंड, टेकोमिटर आणि लेदर स्टेअरिंग व्हील व इतरही काही छोटे मोठे फीचर्स आहेत.

 

New maruti ertiga चे दमदार इंजिन

New maruti ertiga मध्ये 1462 cc चे पावरफुल इंजिन देण्यात आले आहे. जे 101.64 bhp ची पावर व 136.8 nm चा टॉर्क जनरेट करते. यामध्ये 6 स्पीड मॅनुअल गियर बॉक्स आहे. व याचे ऑटोमॅटीक वेरिएंट सुद्धा आहे. 45 लिटर इंधन टाकीची क्षमता असलेली ही गाडी 20 किलोमीटर प्रति लिटर इतका माइलेज देते.

 

New maruti ertiga ची किंमत

जर किंमत बद्दल सांगायचे झाले तर ही गाडी पेट्रोल, डिझेल, CNG, मॅनुअल व ऑटोमॅटीक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 9 वेरिएंट मध्ये मिळते. जिची बेस मॉडेल ची किंमत 8.60 लाखापासून सुरू होते तर टॉप मॉडेलची किंमत 13 लाखापर्यंत आहे. ही एक्स शोरूम मुंबई येथील किंमत आहे. वेगवेगळ्या शहरात किमतीत थोडा फार चढ उतार होऊ शकतो.

 

New maruti ertiga चा बाहेरील लूक

7 सीटर असलेली ही गाडी बाहेरच्या बाजूनेही प्रिमियम लूक देते. व बरेचसे ऑटोमॅटीक फीचर्स ही देते. गाडीच्या समोरील बाजूस डायनॅमिक क्रोम ग्रील दिलेली आहे. तसेच प्रोजेक्टर एलईडी हेडलाईट, ट्यूबलेस टायर, 3D टेल लाइट्स, पावर एडजस्टेबल एक्सटीरियर रियर व्यू मिरर, इंटीग्रेटेड एंटीना या गाडीच्या लुक मध्ये अजूनही भर टाकतात.

 

New maruti ertiga साठी भरा फक्त 2 लाख

New maruti ertiga च्या बेस वेरिएंट ची मुंबई येथील ऑन रोड किंमत 10 लाख रुपये आहे. त्यासाठी जर तुम्ही 2 लाख रुपये डाऊन पेमेंट भरले तर 4 वर्षाच्या परतफेडीसाठी तुम्हाला 20,401 रुपयाचा मासिक हप्ता बसतो. याच्यामध्ये 9.8 टक्क्याचे व्याजही सामील आहे.

ही गाडी घ्यायचा विचार जर तुम्ही करत असाल तर जवळच्या मारुती सुझुकी च्या शोरूममध्ये भेट द्या. तुमच्यासाठी असलेले EMI ऑफर जाणून घ्या तसेच टेस्ट ड्राइव घेऊन New maruti ertiga बद्दल आपल्या शंकांचे निरसन करा.

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment