New Maruti WagonR 2024
Maruti Suzuki WagonR ही मध्यमवर्गीय परिवारांची अतिशय लोकप्रिय गाडी आहे. आता कंपनीने नवीन अत्याधुनिक सेवा – सुविधांसह New Maruti WagonR 2024 लाँच केली आहे. बर्याच वर्षांपसून या गाडीचा दबदबा भारतीय कार बाजारात आहे. तर आता maruti suzuki कंपनीने वाढत्या गाड्यांची डिमांड बघता WagonR ला नवीन फीचर्ससह लॉंच केले आहे. चला तर मग जाणुन घेऊ आपण या गाडीच्या फीचर्सबद्दल.
New Maruti WagonR 2024 चे फीचर्स
जुन्या WagonR शी या गाडीची तुलना केली तर यामध्ये समोरील बाजूस स्टाइलिश फ्रंट ग्रील व मोठे एलईडी हेड लाइट्स देण्यात आले आहेत. तसेच, पावर विंडो फ्रंट, पावर स्टेअरिंग, डिजिटल घड्याळ, ड्राइवर साइड सनवाइजर, लो फ्यूल वॉर्निंग लाइट, एडजस्टेबल ड्राइवर सीट, हिटर व फूल एयर कंडीशन गाडीमध्ये मिळते.
New Maruti WagonR 2024 च्या पावरफुल इंजिन ची क्षमता व जबरदस्त माइलेज
या गाडीमधे 5 स्पीड गिअर बॉक्स ने ऑपरेट होणारे 998 cc चे पावरफुल इंजिन येते. जे की 65.71bhp ची पावर व 89nm चा टॉर्क निर्माण करते. ही गाडी पेट्रोल व CNG अशा दोन वेरिएंट मध्ये येते. पेट्रोल वेरिएंट 25 लिटर प्रति किलोमीटर चा माइलेज देते तर CNG वेरिएंट 34 किलोमीटर प्रति किलो चा माइलेज देते इंधन टाकीची क्षमता 60 लिटर ची आहे. तसेच या गाडीचा टॉप स्पीड 120 किलोमीटर प्रति तास इतका प्रचंड आहे.
New Maruti WagonR 2024 ची किंमत
New Maruti WagonR 2024 ही गाडी इतर गाड्यांच्या तुलनेत फारच स्वस्त आहे. या गाडीची पेट्रोल वेरिएंट ची मुंबई येथील एक्स शोरूम किंमत 5 लाख 51 हजार रुपये इतकी आहे. तर CNG वेरिएंट ची मुंबई येथील एक्स शोरूम किंमत 6 लाख 41 हजार रुपये इतकी आहे.
New Maruti WagonR 2024 चे सुरक्षा फीचर्स
सुरक्षेच्या बाबतीत ही गाडी थोडीशी निराश करते. या गाडीला फक्त एक स्टार सेफ्टी रेटिंग आहे. आणि फक्त 2 एयर बॅगा आहेत. तसेच एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम मुळे या गाडीची सुरक्षा काही अंशी बळकट झाली आहे.
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रायगड येथे लिपिक पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | Raigad DCC Bank Recruitment - 26 August 2024
- ITBP कांस्टेबल किचन सर्विस च्या 819 जागांसाठी 10वीं पास साठी भरती नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024
- RRB Railway NTPC Vacancy: रेलवे NTPC भरतीसाठी 12वीं पास विद्यार्थ्यांना भरती चे नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024