WhatsApp Group Join Now

जाणून घ्या, रस्त्यावरचा रणगाडा – New Toyota Fortuner ची ऑन-रोड किंमत व पूरा EMI प्लान

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

New toyota fortuner : रस्त्यावर चालणारे रणगाडे अशी ख्याती असणारी गाडी म्हणजे new toyata fortuner जवळपास सगळ्याच राजकारणी व नगरसेवक लोकांची पाहीली पसंद ही गाडी आहे. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यात सुद्धा fortuner ही गाडी आहे. या गाडी बद्दल शहर व ग्रामीण भाग या दोन्हींमध्ये कमालीची क्रेझ आहे. म्हणून ही गाडी घेणे बर्‍याच लोकांचे स्वप्न देखील आहे. चला तर मग जाणुन घेऊ या गाडीची ऑन रोड किंमत, ईएमआई (EMI) ऑफर व इतर फीचर्स

 

कोणकोणते फीचर्स आहेत खास New toyota fortuner मध्ये

8 इंचाची इन्फोटेंमेंट टचस्क्रीन जी की एंड्रॉयड ऑटो, अ‍ॅपल कारप्ले व ब्लूटुथ सपोर्ट करते. वायरलेस फोन चार्जिंग आणि या गाडीमध्ये तुम्हाला JBL चे तब्बल 11 स्पीकर्स मिळतात. तसेच लेदर इलेक्ट्रिकल स्टेअरिंग व्हील व एडजस्टेबल पावर स्टेअरिंग सुद्धा मिळते. वेंटिलेटेड सीट, हीटर, फ्रंट व रिअर दोन्ही पावर विंडो, फुल एअर कंडिशनिंग सिस्टीम, ऑटोमॅटीक क्लायमेट कंट्रोल, आधुनिक व्हॉईस कंट्रोल असे बरेचसे शानदार फीचर्स या गाडीमध्ये पहायला मिळतात.

 

New toyota fortuner ची इंजिन क्षमता

ही गाडी तुम्हाला 4×2 व 4×4 अशा दोन वेरिएंट मध्ये पहायला मिळते. जे की पेट्रोल व डिझेल अशा दोन्ही इंजिन टाइप मध्ये उपलब्ध आहे. डिझेल इंजिन बाबत बोलले तर 2.7 लिटरचे दमदार इंजिन या गाडीमध्ये आहे. जे की 4 सिलेंडर सोबत 2755 cc चे आहे. आणि ज्याला 20 bhp ची पावर व 500 nm चा टाॅर्क निर्माण होतो. 7 सीटर असलेली ही गाडी 8 ते 10 लिटर प्रति किलोमीटर इतका माइलेज देते. व 80 लिटर इतकी प्रचंड क्षमता इंधन टाकीची आहे. ऑटोमॅटीक व मॅनुअल अशा दोन्ही प्रकारांमध्ये ही गाडी तुम्ही खरेदी करू शकतात.

 

New toyota fortuner ची किंमत व EMI ऑफर

तस पहायला गेल तर ही गाडी खूप महाग आहे. तिच्या बेस मॉडेल ची किंमत 33 लाखांपासून सुरू होते. व टॉप मॉडल 50 लाखांपर्यंत जाते. ही मुंबई येथील एक्स शोरूम किंमत आहे. जर या गाडीचे टॉप मॉडेलची ऑन रोड किंमत बघितली तर ती 60 लाखांपर्यंत सुद्धा जाते. ऑफर बद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला 25 टक्के डाउन पेमेंट भरून तुम्ही ही गाडी खरेदी करू शकतात व 70 हजार ते 1 लाख इतका मासिक हप्ता द्यावा लागेल तेव्हा ही गाडी तुम्हाला EMI वर मिळेल.

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment