WhatsApp Group Join Now

शासकीय भरती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती ; 10 वी पास व पदवीधरांना संधी | Ratnagiri DCC Bank Bharti

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Ratnagiri DCC Bank Bharti : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत 10 वी पास व पदवीधरांना मिळणार नौकरीची संधी Ratnagiri DCC Bank Bharti ची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. त्यानिमित्ताने 10 वी पास व कोणत्याही शाखेतील पदवीधर असलेल्या व नौकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपआपले अर्ज सादर करावेत. अर्ज दाखल करण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांनी खाली दिलेली अधिकृत जाहीरात जरूर पहावी.

 

Ratnagiri DCC Bank Bharti च्या रिक्त पदांची संख्या

एकूण 179 जागा भरायची आहेत. त्यापैकी व्यवस्थापक 03, उप व्यवस्थापक 06, लिपिक ची 131 पदे व शिपाई ची 39 पदे भरण्यात येणार आहेत.

 

Ratnagiri DCC Bank Bharti शैक्षणिक पात्रता

व्यवस्थापक पदासाठी उमेदवार हा 03 वर्षाच्या अनुभवासह मान्यताप्राप्त विद्यापीठातून कुठल्याही शाखेतील पदवीधर असावा. आणि MS-CIT किंवा समतुल्य

उप व्यवस्थापक पदासाठी उमेदवार हा 02 वर्षाच्या अनुभवासह मान्यताप्राप्त विद्यापीठातून कुठल्याही शाखेतील पदवीधर असावा. आणि MS-CIT किंवा समतुल्य

लिपीक पदासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. आणि MS-CIT पास असावा. किंवा समतुल्य संगणकाची अर्हता प्राप्त केलेला असावा.

तसेच शिपाई पदासाठी उमेदवार किमान 10 वी पास असावा.

 

Ratnagiri DCC Bank Bharti वयाची अट

उमेदवाराचे वय व्यवस्थापक व उप व्यवस्थापक पदासाठी 25 वर्ष ते 40 वर्ष दरम्यान असावे. लिपिक साठी 21 वर्षे ते 40 वर्षे दरम्यान असावे. आणि शिपाई पदासाठी 18 वर्षे ते 40 वर्षे दरम्यान असावे परंतु राखीव प्रवर्गासाठी 05 वर्षे अतिरिक्त सुट आहे.

 

Ratnagiri DCC Bank Bharti अर्जाचा शुल्क

सर्व उमेदवारांसाठी 1000 रुपये रुपये शुल्क आहे. (GST धरून)

 

Ratnagiri DCC Bank Bharti निवड प्रक्रिया

अर्ज दाखल केल्यानंतर 90 गुणांची कंप्यूटर वर आधारित CBT परीक्षा घेण्यात येईल. त्यामध्ये पास झालेल्या उमेदवारांची 10 गुणांची मुलाखत घेतली जाईल. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी करण्यात येईल. व अंतिम निवड करण्यात येईल.

 

Ratnagiri DCC Bank Bharti इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण रत्नागिरी जिल्हा

संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा : इथे बघा

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 09 ऑगस्ट 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment