WhatsApp Group Join Now

आता आर्टीगा चा सूपड़ा साफ फक्त 6 लाखात भारतातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार,एकाच वेळी संपूर्ण कुटुंब त्यामध्ये आरामात बसेल

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Renault Triber price and offers : जर तुमचा बजेट कमी असेल आणि कुटुंब मोठ असेल तर तुमच्यासाठी बाजारात उत्तम पर्याय उपलब्ध आहे. तो म्हणजे Renault Triber ही गाडी कमी किमतीत दमदार इंजिन व चांगले फीचर्स देते. या गाडीची किंमत आधी 7 लाख रुपये होती परंतु आता 6 लाख रुपये झाली आहे. त्यानिमित्ताने मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ही गाडी सध्या तरी सर्वोत्तम आहे. ही गाडी MPV सेगमेंट मध्ये असल्याने बाजारात तिने मारुती आर्टीगा ला टक्कर दिलेली आहे. कारण आर्टीगा पेक्षा मेंटेनन्स सुद्धा या गाडीचा कमी आहे.

 

Renault Triber मध्ये आहे दमदार इंजिन

या गाडीमधे तुम्हाला 4 सिलेंडर असलेले 999 सीसी चे इंजिन देण्यात आले आहे. जे की 71 bhp ची पावर व 96nm चा टाॅर्क निर्माण करते. जे की 5-स्पीड ने ऑपरेट होते. या गाडीमधे फक्त पेट्रोल इंजिन आहे. डिझेल इंजिन मध्ये ही गाडी उपलब्ध नाही. 140 किलोमीटर चा टॉप स्पीड असलेली ही गाडी 20 किलोमीटर प्रति लिटर इतका माइलेज प्रदान करते. इंधन टाकीची क्षमताही 40 लिटर इतकी आहे. म्हणजेच एक वेळेस टाकी फुल केल्यानंतर 600 किलोमीटर अंतर ही गाडी पार करते.

 

Renault Triber मध्ये काय आहेत फीचर्स

Renault Triber या गाडीमधे 8 इंचाची इन्फोटेंमेंट एलसीडी स्क्रीन दिलेली आहे. पावर ऑन ऑफ बटण, एलईडी लाइट्स, एलईडी इंडिकेटर्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एडजस्टेबल ड्राइवर सीट, पावर स्टेअरिंग, सीट बेल्ट वार्निंग, चाइल्ड सेफ्टी लॉक व फ्रंट पावर विंडों असे बेसिक फीचर्स देण्यात आले आहेत. परंतु 7 सीटर असलेल्या या गाडीमधे फक्त दोनच एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत.

 

Renault Triber ची किंमत व ऑफर्स

MPV सेगमेंट मध्ये असलेली ही सर्वात स्वस्त व किफायतशीर दरात उपलब्ध असलेली गाडी आहे. या गाडीची बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत 6 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेल ची एक्स शोरूम किंमत 8 लाख 90 हजार रुपयांपर्यंत आहे. तसेच या गाडीसाठी तुम्हाला EMI सुविधा ही उपलब्ध आहे. जर तुम्ही 50 हजार रुपये डाउनपेमेंट भरले तर 9.8 टक्के व्याजदराने 4 वर्षांची परतफेड घेतली तर 15,220 रुपये इतका मासिक हप्ता असेल.

 

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment