WhatsApp Group Join Now

रेल्वे भरती : भारतीय रेल्वे मध्ये 7951 जागांसाठी भरती ; येथे करा अर्ज | RRB JE Bharti 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

RRB JE Bharti 2024 : या वर्षातील अभियंत्यांसाठी सर्वात मोठी भरती RRB JE Bharti 2024 रेल्वे मंत्रालयाकडून निघाली आहे. या मार्फत लेवल 6 व लेवल 7 च्या विविध पदांवर भरती होणार आहे. इंजिनियरिंग झालेल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. कारण ही पदे मानाची तर आहेतच पण त्यांचा पगारही उत्तम आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. इच्छुक व पात्र असलेल्या तरुणांनी खाली दिलेली माहिती वाचून व आपली पात्रता ठरवून दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज दाखल करावा.

 

RRB JE Bharti 2024 च्या रिक्त पदांची संख्या

एकूण 7951 जागा भरायच्या आहेत. त्यापैकी 17 जागा केमिकल सुपरवाइजर / रिसर्च अँड मेटालुर्जीकल सुपरवाइजर / रिसर्च ची आहेत जी की लेवल 7 ची आहेत. आणि 7934 जागा जूनियर इंजीनियर , डेपो मटेरियल सुपरिटेंडेंट, केमिकल & मेटालुर्जीकल असिस्टंट च्या भरण्यात येणार आहेत.

 

RRB JE Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंजिनियरिंग पदवी 30 जुलै ला सविस्तर पात्रता जाहीर करण्यात येईल. (सविस्तर पात्रतेसाठी खाली दिलेली अधिकृत जाहीरात पहावी.)

 

RRB JE Bharti 2024 वयाची अट

उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2025 पर्यंत 18 वर्षे ते 36 वर्षे दरम्यान असावे. परंतु एससी, एसटी 05 वर्षे तर ओबीसी 03 वर्षांची अतिरिक्त सुट देण्यात आली आहे.

 

RRB JE Bharti 2024 अर्जाचा शुल्क

सर्वसाधारण व ओबीसी उमेदवारांसाठी 500 रुपये तर एससी, एसटी, महिला, माजी सैनिक, EWS आणि अपंग उमेदवारांसाठी 250 रुपये शुल्क आहे.

 

RRB JE Bharti 2024 निवड प्रक्रिया

सर्वप्रथम उमेदवारांची CBT – 1 परीक्षा घेण्यात येईल. CBT – 1 पास झाल्यानंतर CBT – 2 घेण्यात येईल. त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करून व वैद्यकीय चाचणी घेऊन अंतिम निवड करण्यात येईल.

 

RRB JE Bharti 2024 इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा : इथे बघा

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 29 ऑगस्ट 2024

ऑनलाइन अर्ज सादर करणे सुरू होण्याची तारीख : 30 जुलै 2024

 

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment