WhatsApp Group Join Now

बिना परीक्षा भरती ; भारतीय स्टेट बँकेत 1,040 जागांसाठी मेगा भरती | SBI SO Bharti

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

SBI SO Bharti : बॅंकेत नौकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी स्टेट बँकेने SBI SO Bharti ची अधिसूचना जाहीर केली आहे. स्टेट बॅंकेत नौकरी करणे तरुणांचे स्वप्नच असते. कारण स्टेट बँक ही सरकारी बँक तर आहेच पण तिच्या कर्मचाऱ्यांना सुविधाही चांगल्या मिळतात. परंतु आता हे लाखो तरुणांचे स्वप्नं आता सत्यात उतरण्यासाठी SBI SO Bharti ही प्रक्रिया राबविली जात आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपापले अर्ज खाली दिलेल्या वेबसाइट जाऊन दाखल करावेत.

 

SBI SO Bharti च्या रिक्त पदांची संख्या

एकूण 1040 पदे भरायची आहेत. जी की विविध विभागात आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रीजनल हेड, रिलेशनशिप मॅनेजर, प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर, इन्वेस्टमेंट ऑफिसर, इन्वेस्टमेंट स्पेशलिस्ट, व सेंट्रल रिसर्च टीम अशी विविध दर्जाची पदे भरण्यात येणार आहेत.

 

SBI SO Bharti शैक्षणिक पात्रता

वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर, पदव्युत्तर पदवी, MBA , B.Tech , PGDBM, PGDM, CA, किंवा समतुल्य शैक्षणिक अर्हता प्राप्त केलेला असावा. (सविस्तर पात्रतेसाठी खाली दिलेली अधिकृत जाहीरात पहावी.)

 

SBI SO Bharti वयाची अट

उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2024 पर्यंत विविध पदांसाठी वेगवेगळी अट आहे. त्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहीरात पहा. आणि एससी, एसटी 05 वर्षे तर ओबीसी 03 वर्षे अतिरिक्त सुट आहे. (सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहीरात पहा)

 

SBI SO Bharti अर्जाचा शुल्क

सर्वसाधारण व EWS उमेदवारांसाठी 750 रुपये तर एससी, एसटी, ओबीसी आणि अपंग उमेदवारांना शुल्क माफ करण्यात आला आहे.

 

SBI SO Bharti निवड प्रक्रिया

अर्ज दाखल केल्यानंतर शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल. आणि मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल. मुलाखत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करण्यात येईल. व अंतिम निवड करण्यात येईल.

 

SBI SO Bharti इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतात

संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा : इथे बघा

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 08 ऑगस्ट 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment