WhatsApp Group Join Now

Maruti Ciaz चा सूपड़ा साफ करण्यासाठी आली स्वस्तात मस्त Toyota Belta, दमदार इंजिन व आकर्षक डिझाइन

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Toyota Belta Detail In Marathi

Toyata कंपनीने आपली अप्रतिम पाच सिटर सेडान असलेली Toyota Belta ही गाडी भारतीय कार बाजारात लॉंच करण्याचे ठरविले आहे. या गाडीचे डिजाइन Maruti ciaz शी मिळते-जुळते आहे. Maruti व toyata च्या भागीदारीतून याआधीही toyata ने Maruti च्या brezza व baleno ला आपल्या कंपनीतून मॅन्युफॅक्चरिंग केले होते. Toyota Belta ही गाडी पुढील महिन्यात 21 तारखेला लॉंच होणार आहे. 2021 मध्ये मिडल ईस्ट कार बाजारात लॉंच केले होते. तेथे या गाडीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे ही गाडी आता भारतीय बाजारात लॉंच होत आहे. त्यानिमित्ताने आजच्या लेखात आपण Toyota Belta बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

 

Toyota Belta चे प्रीमियम फीचर्स

Toyota Belta या गाडीचे इंटेरियर खूपच आकर्षक बनविण्यात आले आहे. ज्यामध्ये इंजिन चालू बंद बटण, फूल एयर कंडीशन एसी, मल्टी फंक्शन पावर स्टेअरिंग व्हील, 360 डिग्री चा पार्किंग कॅमेरा, क्लायमेट कंट्रोल, हाई स्पीड अलर्ट सिस्टम, 6 एयरबॅगा, पॅनारोमिक सनरूफ, एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि 7 इंचाचा टचस्क्रीन एंटरटेनमेंट डिस्प्ले ज्यामध्ये अ‍ॅपल कारप्ले व अँड्रॉईड ऑटो यांचा सपोर्ट असेल. तसेच बाहेरील लूक सुद्धा आकर्षक बनविले आहे. ही गाडी 7 रंगांमध्ये उपलब्ध आहे. उरलेले जवळपास सर्वच फीचर्स Maruti ciaz सारखेच आहेत.

 

Toyota Belta चे दमदार इंजिन

Toyota Belta या गाडीमध्ये 1462 सीसी चे पावरफुल इंजिन देण्यात आले आहे. जे की 105 bhp ची पावर व 138 nm चा टाॅर्क जनरेट करते. 1.5 लिटर चे 4 सिलेंडर वाले पेट्रोल इंजिन आहे. जे की 5 मॅनुअल गिअर बॉक्स ने ऑपरेट होईल. ही गाडी वेगवेगळ्या 5 वेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. माइलेज बद्दल सांगायचे झाले तर 20 किलोमीटर प्रति लिटर इतका माइलेज या गाडीचा आहे. आणि 140 पर्यंत या गाडीचा टॉप स्पीड आहे.

 

Toyota Belta ची परवडणारी किंमत

Toyota Belta ही गाडी 21 जुलै 2024 रोजी लॉंच होणार आहे. ही गाडी सेडान सेगमेंट मध्ये धमाल करेल अशी अपेक्षा आहे. या गाडीच्या बेस मॉडेल ची किंमत 10 लाखापासून सुरू होते आणि टॉप मॉडल 20 लाखापर्यंत जाईल असा अंदाज आहे.

 

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment