WhatsApp Group Join Now

Zilla Parishad Yojna 2024 : जिल्हा परिषद योजनेमार्फत शिलाई मशीन, सायकल व ताडपत्रीचे वाटप सुरु; त्वरित करा अर्ज 

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Zilla Parishad Yojna 2024 : महाराष्ट्रात आता विधानसभेची निवडणूक असल्याने राज्य शासनाकडून जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना जाहीर होत आहेत. अशातच जिल्हा परिषद सुद्धा मागे नाही. जिल्हा परिषद व महानगरपालिका सुद्धा विविध योजना जाहीर करत आहेत. आता जिल्हा परिषदेने अशीच एक योजना जाहीर केली आहे. त्याची माहिती पुढीलप्रमाणे आहे. 

जिल्हा परिषद मार्फत सन 2024-25 वर्षासाठी 20% व 5% जिल्हा परिषद सेस फंड योजना अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत तरी इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे स्वत: जिल्हा परिषदेकडून कळविण्यात येत आहे.

 

Zilla Parishad Yojna 2024 चा संपूर्ण तपशील 

  1. महिलांसाठी शिलाई मशीन
  2. मासेमारी व्यावसायिक असलेल्या नागरिकांना नायलॉनची जाळी
  3. शेतकऱ्यांसाठी ताडपत्री
  4. पाच टक्के दिव्यांगाना लघुउद्योगासाठी अर्थसहाय योजना
  5. 5 वी ते 11 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलांना व मुलींना सायकल

 

Zilla Parishad Yojna 2024 अर्जाचा कालावधी 

या योजनेमुळे सर्वसामान्य नागरिक, शाळेतील विद्यार्थी आणि दिव्यांग व्यक्तींना सुद्धा खूप लाभ होणार आहे. ही योजना जरी जिल्हा परिषद मार्फत असली तरी यासाठी नागरिकांना जिल्हा परिषदेत जाण्याची आवश्यकता नाही. थेट पंचायत समिती कार्यालयात जाऊन अर्ज दाखल करता येईल. हे अर्ज 31 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

 

Zilla Parishad Yojna 2024 साठी लागणारी कागदपत्रे 

  1. ग्रामसेवकाकडील रहिवासी दाखला
  2. जातीचा दाखला
  3. आधार कार्ड
  4. 50 हजार रुपये च्या आतील उत्पन्नाचा दाखला
  5. शाळा सोडण्याचा दाखला
  6.  ७/१२ व नमुना ८ अ उतारा
  7. इलेक्ट्रिक बिल पावती
  8. कर भरल्याची पावती
  9. बँकेचे पासबुक (त्याला आधार कार्ड लिंक असायला हवे.)

 

Zilla Parishad Yojna 2024 अर्जाची प्रक्रिया 

  • जिल्हा परिषद विविध योजनेमार्फत आपल्या उत्पन्नाचा 20% निधी अनु.जाती,अनु.जमाती, विजा आणि भज प्रवर्गाच्या कल्याणकारी योजनांवर खर्च करते. त्यामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे.
  • या योजनेसाठी पंचायत समिती मार्फत अर्ज कार्यालय ,जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जि.प.वर्धा यांचेकडे स्वीकारण्यात येतात.
  • अर्जांची छाननी करून पात्र व अपात्रतेची यादी तयार करण्यात येते.
  • पात्र लाभार्थ्यांची यादी समाज कल्याण समितीच्या सभेत सादर करण्यात येते.
  • जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समिती मार्फत तालुका स्तरावर लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.
  • या योजनेसाठी निवड झालेल्या लाभार्थ्यास पत्राद्वारे कळविण्यात येते. की तुमची निवड झाली आहे.
  • लाभार्थ्यांची ज्या वस्तू साठी निवड झालेली आहे त्या वस्तु साठी मंजूर केलेली रक्कम DBT द्वारे लाभार्थ्यांच्या बँक अकाऊंट मध्ये हस्तांतरित करण्यात येईल.
  • संबंधित वस्तूंची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत लाभार्थ्याने साहित्याची खरेदी करून त्यासंबंधीचे बिल पंचायत समितीस सदर करणे आवश्यक आहे.
  • या योजनेची प्रोसेस 02 ते 03 महिन्यात पुर्ण होते.

 

Zilla Parishad Yojna 2024 चे प्रसिद्धीपत्रक : येथे बघा. 

सविस्तर माहितीसाठी आपल्या जवळच्या पंचायत समितीला भेट देऊन विचारपूस करा.

 

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

2 thoughts on “Zilla Parishad Yojna 2024 : जिल्हा परिषद योजनेमार्फत शिलाई मशीन, सायकल व ताडपत्रीचे वाटप सुरु; त्वरित करा अर्ज ”

Leave a comment